नागपुर गरीबांच्या राशनचा सरकारी तांदूळ राशन मफियाच्या घरात

60

 

नागपुर जिल्हात राशन माफिया खात आहे, गरीबांच्या टाळूवरील लोणी.

नागपुर:- पल्लवी मेश्राम:- कोरोना वायरसच्या महामारीने जनतेचे हाल होत आहे. आज गरीब जनता, कामगार, मजूर बेरोजगार झाले आहे. त्यांना व त्यांचा परिवारानांं उपासमारीच्या काळातुन आपला उदरनिर्वाह करण्यास भाग पळत आहे. म्हणून केंद्र सरकारने गोर गरीब जनते करीता राशन धान्य दुकानामार्फत 3 रुपये किलो तांदूळ व 2 रुपये किलो गहू अशाप्रकारे राशन देण्याचे ठरवले आहे.
शासनाचा हेतू देशातील गोर, गरीब, कामगार, शेतमजूर यांना उपासमारीची झळ पोहचू नये म्हणून महिन्याकाठी प्रति व्यक्ती 5 किलो राशनचे वाटप करण्यात आले. सध्यास्थितीत देशात कोरोना व्हायरसने कहर माजविला असून देशाला लॉकडाऊन करण्यात आले होते. या लॉकडाऊन दरम्यान काम करणारे हात रिकामे पडले. त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची झळ पोहचू नये म्हणून शासनाच्या वतीने 3 महिन्याचे अन्नधान्य राशन दुकानामार्फत प्रती व्यक्ती महिन्याकाठी 5 किलो तांदूळ व 1 किलो चना डाळ मोफत देण्यात आले. पण शासनाचा हेतू गरीबाप्रती उदात्त असला तरी मात्र गरीबांच्या टाळूवरील लोणी खाणा-यांना हे पचवत नसल्याने नागपुरसह परिसरात गरीबांच्या मिळणा-या सरकारी राशनवर नजर ठेवून राशन घेणारे खाजगी व्यापारी गरीबाच्या घरी जाऊन 2 रुपये व 3 रुपये किलो मिळणारे तांदूळ, 14 ते 15 रुपये प्रती किलो खरेदी करीत आहेत. अशी माहिती काही समाजिक कार्यकर्त्या पल्लवी मेश्राम, राजकुमारी फोपले, रेश्मा नंदागवळी, दैना लिंगेकर यांना कळली या घटनेची शाहनीशा करण्याकरीता त्यांनी नागपुर अन्न पुरवठा अधिकारी माया घोरपडे यांच्याशी संपर्क केला. आणी या राशन धान्याचा गोरखधंद्याची माहिती दिली.
काही लोकांनी याबाबतीत माहिती दिली की, नागपुरसह परिसरातील गावात असे खाजगी व्यापारी असून आधीच त्यांच्या घरी पैसे नेवून देणे व राशन दुकानाजवळ उभे राहून तिथूनच राशन घेऊन जाणे असला प्रकार नागपुरसह इतर गावात सुरू आहे. तरी संबंधित वरिष्ठ अधिका-यांनी राशनचे धान्य घेणा-या खाजगी व्यापा-यावर कार्यवाही करावी अशी मागणी, अन्न पुरवठाअधिकारी यांना केली आहे.