*नागपुर महिलेच्या मृत्यूला जबाबदार कोण*?

56

 

नागपुर:- प्रशांत जगताप- आज आरोग्य सेवेचा नावाखाली फक्त हलगर्जी भूमिका दिसून येत आहे. या कोरोना वायरच्या महामारीच्या काळात खाजगी रुग्णालयांंपासुन ते सरकारी रुग्णालयातील सर्व लोकांची माणूसकीच हरवली असल्याची अनेक घटना वरुन दिसून आले.
नागपुर येथील टेकानका येथील एका महिला रुग्णाला तबल 15 खाजगी रुग्णालयांंन भरती करुन घेण्यास नाकारले. या रुग्णालयांंन सिरियस असलेली या महिलेला रुग्णालयांंच्या दारातुन परत पाठवले. शेवटी मेयो रुग्णालयात नेले असता मेयो मधिल डॉक्टरांनी त्या महिलेला नागपुर मेडिकल रुग्णालयात रेफर केले. सकाळी 7 वाजता मेडिकल रुग्णालयाच्या कॅज्युअल्टी बाह्यरुग्ण वार्डमधे नेण्यात आले; परंतु उपस्थीत डॉक्टरांनी त्या महिलेला तातडीने तपासले नाही. सकाळी 7 वाजता आलेली महिला आलेली महिला रुग्णला 11 वाजे पर्यंत तातकाळत रहाव लागलं. अखेर भरती करण्यात आले. मात्र, ऑक्सिजन नसल्याने थांबावे लागेल, असे सांगितले गेले. अखेर चांगली आरोग्य सेवा न मिळाल्यामुळे एक महिला रुग्णाचा दुर्दवी अंत झाला. नागपुर शहरांमध्ये शासनाने 51 खाजगी रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून मान्यता दिली आहे. पण सिरियस रुग्णाला एक बेड उपलब्ध होत नाही, किती मोठी शोकांतीका मनावी लागेल. आज रुग्णालयात फक्त हलगर्जी पणा आणी पैसाची लूट सुरु असुन, प्रशासन आणी रुग्णालय यांच्यात समन्वय नसल्याने रुग्णा मोट्या प्रमाणावर हाल होत आहेत. असा आरोप मृत महिलेचा नातेवाईकांनी केला