मिडिया वार्ता न्युज तर्फे ‘माझा गणपती सुंदर गणपती’ घरगुती गणेशोत्सव स्पर्धा 2021

48

मिडिया वार्ता न्युज तर्फे ‘माझा गणपती सुंदर गणपती’ घरगुती गणेशोत्सव स्पर्धा 2021

ही स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि तालुक्यात घेतली जाईल.

मिडिया वार्ता न्युज तर्फे ‘माझा गणपती सुंदर गणपती' घरगुती गणेशोत्सव स्पर्धा 2021
मिडिया वार्ता न्युज तर्फे ‘माझा गणपती सुंदर गणपती’ घरगुती गणेशोत्सव स्पर्धा 2021

मुंबई :महाराष्ट्रात सर्वीकडे बाप्पाचे आगमण झाल आहे. बाप्पाच्या आगमणा बरोबर घरात एक नविन चैत्यन आल्या सारखा भास होत आहे. 10 दिवस चालणा-या आपल्या लाडख्या गणपती बाप्पाचा गणेशोत्सव श्रद्धा, समृद्धी, भक्ति भावाबरोबरच पर्यावरणाशी बांधिलकी जपण्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध वृत्तपत्र मिडिया वार्ता न्युज ‘जन आरोग्य सेवा संस्था’ आणि मिडिया वार्ता न्युज परीवार यांनी संयुक्तरित्या ‘पर्यावरण पुरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धा 2021’चे आयोजन केले आहे.

आपल्या लाडक्या बाप्पाच्या मंगल पूर्वक गणेशोत्सव पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती घरी बसवून त्याभोवताल पर्यावरणस्नेही सजावट करुन आपल्या बाप्पा जगातील कानाकोप-यात जाण्यासाठी गणेशभक्तांना या स्पर्धेत सहभागी होता येईल.

‘माझा गणपती सुंदर गणपती’ घरगुती गणेशोत्सव स्पर्धा 2021 ही स्पर्धा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका विभागांत घेतली जाईल. सुंदर आणि पर्यावरण पुरक गणेशमुर्ती ला प्रमाणपत्र व पारितोषिक देण्यात येणार आहे. 

राज्यात सर्वत्र करोना वायरसचे सावट असल्याने अनेक गणेशभक्तांनी पर्यावरणपुरक गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणून, अगदी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निश्चय केला आहे. आज वाढत असलेल्या प्रदूषणामुळे भविष्याचे होणारे नुकसान जाणवत असल्याने नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरुकताही वाढत आहे. प्लास्टिक, थर्माकोल यांसारख्या पर्यावरणासाठी घातक वस्तूंवर बंदी असल्याने गणेशभक्तांनी सजावटीचे अनेक कल्पक मार्ग शोधले आहेत. याच कल्पकतेला चालना देण्यासाठी मिडिया वार्ता न्युज तर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

‘माझा गणपती सुंदर गणपती’ सहभागासाठी.
‘माझा गणपती सुंदर गणपती’ या स्पर्धेतिल सहभागासाठी आपल्या गणपती बाप्पाचे तीन ते चार रंगीत छायाचित्र मिडिया वार्ता न्युजच्या संपादकीय मंडळ, ब्युरो चीफ, प्रतिनिधी यांना भ्रमणध्वनी फ़ोनच्या मध्यमातुन दिनांक 20 सप्टेंबपर्यंत पाठवावीत. गणपती बाप्पाची छायाचित्रे तिन्ही बाजूंनी वेगवेगळी घ्यावीत. त्यात गणेशमूर्ती, मखर, देखावा इत्यादी स्पष्ट दिसणे आवश्यक आहे.

छायाचित्र व माहित मिडिया वार्ता न्युजच्या ईमेल आयडीवर पण पाठवु शकता. उशिरा मिळालेल्या छायाचित्रांचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही. गणपती बाप्पाची मूर्ती व सजावट पर्यावरणस्नेही असावी. प्लास्टिक  आणि थर्माकोलचा वापर टाळावा. प्रत्येक छायाचित्रासोबत स्पर्धकाचे नाव, पत्ता, संपर्क  क्रमांक, ई-मेल आयडी आणि सजावटीसाठी वापरलेल्या साहित्याची यादी थोडक्यात जोडावी. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.

वर्धा जिल्ह्यात उत्साहात विघ्नहर्ता गणपती बाप्पांचे घराघरात आगमन

अधिक माहितीसाठी संपर्क:
भागुराम सावंत मुख्य संपादक मो. नंबर 99208 53847, प्रशांत जगताप कार्यकारी संपादक 9766445348, 7385445348, मनोज खोब्रागडे मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ मो. नं. 8208166961

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काय करावं?

– आमच्या 99208 53847 या व्हॉट्सअॅप नंबरवर किंवा mediavartanews3@gmail.com आयडीवर खालील माहिती पाठवा
– तुमचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक पाठवा
– बाप्पांच्या मूर्तीचा फोटो
– सजावट आणि देखाव्याचा फोटो
– गणपती किती दिवसांचा आहे?
– सजावट / देखाव्यासाठी काय केले आहे?
– किती वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत आहात?
– इको फ्रेंडली गणोशोत्सव साजरा करावा असे का वाटले? किंवा त्यामागची प्रेरणा काय होती?

ज्या गणपतीला सर्वाधिक वोट, तो ठरणार विजेता!

– तुम्ही दिलेली माहिती आम्ही www.mediavartanews.com या वेबसाईटवर अपलोड करु
– त्यानंतर त्याची पोस्ट मिडीया वार्ता न्यूजच्या फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर शेअर केली जाईल.
– तुम्ही सोशल मीडियावर असाल तर तुम्हालाही त्यात टॅग केले जाईल.
– तुम्हालाही तुमची लिंक पाठवली जाईल. या लिंकवर तुमच्या गणपतीसाठी वोटिंगचा पर्याय असेल
– ज्यांच्या लिंकवर जास्तीत जास्त वोट मिळतील त्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकानुसार आकर्षक बक्षिसे दिली जातील!