कलाकारांच्या मानधनाकरिता आमदार धोटेना दिले निवेदन; झाडीपट्टीतील नाट्यप्रयोगाच्या सादरीकरणाची परवानगी द्या

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी:- गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या माहामारीने कलावंतांचे रोजगार बुडाले आहेत. हातावर आणून पानावर खाण्याची कलावंताची परिस्थिती असल्याने कोरोनाच्या महामारीत होणाऱ्या कार्यक्रमावर शासनाने निर्बंध आणलेत. त्यामुळे कलावंताचा संपूर्ण रोजगार बुडाला आहे. तेव्हा ग्रामीण कलावनताना मानधन सुरू करून झाडीपट्टीतील नाट्य नाट्यप्रयोगाच्या सादरीकरणाची परवानगी द्यावी अशा मागणीचे निवेदन आमदार सुभाष धोटे व गोंडपीपरी तहसीलदार यांना देण्यात आले.
गोंडपीपरी तालुका संघटनांच्या वतीने सदर निवेदन देण्यात आले.यावेळी राजुरा निर्वाचन क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे दिलेल्या निवेदनाचा गाभिर्याने विचार करून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविल्या जाईल व शासन स्तरावर मागणी निश्चितपणे रेथुन धरल्या जाईल असे आस्वासन दिले. गेल्या दोन वर्षांपासून झाडीपट्टीचे नाट्यप्रयोग बंद असल्याने कालावंतावर उपासमारीची वेळ आली असल्याने, नाट्यप्रयोगाच्या सादरीकरणाकरिता परवानगी द्यावी व या मागणीचा गाभिर्याने विचार करण्यात यावा. तसेच कलावनताना उपासमारीच्या काळात मानधन देऊन सहकार्य करावे अशा मागणीचे निवेदन आमदार सुभाष धोटे व तहसीलदार गोंडपीपरी यांना देण्यात आले. यावेळी गोंडपीपरी तालुका संघाचे अध्यक्ष अखिल भासारकर, सचिव अक्षय उराडे, राजकपूर भडके, विसवास पुडके, स्वप्नील निमगडे, संदेश भासारकर यांचेसह तालुक्यातील जेष्ठ कलावंतांची उपस्थिती होती.