जसे मोती बाग (उद्यान) याचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज उद्यान दिले तसेच मोती तलावाला बुध्द भूषण नाव द्या: सतीश म्हस्के यांची मागणी

सतीश म्हस्के
जालना जिल्हा प्रतिनिधी 9765229010
जालना:- जगविख्यात शांतीचे मार्ग दाता तथागत भगवान गौतम बुद्धांचा नगर परिषद प्रशासनाने ठराव मंजूर करून मोती तलावात बुध्द मुर्ती बसवण्याची नियोजित जागा असल्याने त्या तलावाला छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेल्या बुध्द भूषण ग्रंथाचे नाव दिल्यास आपण जालना शहराचे नाव जागतिक पातळीवर पोहोचेल व जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल यामुळे स्थानिक लोकांना बेरोजगार लोकांना रोजगाराची संधी मिळेल, ज्या प्रमाणे आपण मोती बाग (उद्यान) चे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज ठेवण्यात आले त्या अनुषंगाने आपण सर्वजन नगर परिषद प्रशासनाने ठराव मांडून मोती तलावाचे बुध्द भूषण तलाव असे नाव देण्यात यावे. असे निवेदन जालना नगर परिषद मुख्याधिकारी यांना जनता दरबार सामाजिक संघटना सचिव सतीश म्हस्के यांनी मागणी केली आहे.