पुण्यातील १४ वर्षाच्या अज्ञान बालिकेवर झालेल्या सामुहिक अत्याचाराच्या निषेधार्थ श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान तर्फे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन

68

विशाल सुरवाडे
जळगाव जिल्हा प्रतिनिधी 

जळगाव:- पुण्यात १४ वर्षांच्या अज्ञान बालिकेवर १३ व्यक्तीद्वारा सामुहिक अत्याचार करण्यात आलेला आहे. पशुला सुध्दा लाजवेल अशा प्रकारचे राक्षसी कृत्य या नराधमांनी केलेले आहे. तरी या नराधमांना जास्त कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारचे कृत्य या लोकांनी केलेले आहे. तसेच या घटनेमुळे समाजामध्ये संतापाची भावना निर्माण झालेली असुन अशा घटनांमुळे समाजातील वातावरण दुषित होत आहे. महाराष्ट्राची भूमी ही साधू – संतांची महान परंपरा लाभलेली व छत्रपती श्री. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभुमी आहे. तथा महाराष्ट्र राज्यातील पुणे या शहराला विद्येचे माहेर घर असे संबोधिले जात असते आणि येथे अशा प्रकारची घटना घडणे लज्जास्पद आहे.

तरी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान विभाग जळगांव यांचे तर्फे सदरील घटनेचा निषेध करण्यात येत असुन या १३ व्यक्ती वर कठोर कारवाई करण्यात यावी याकामी सदरील निवेदन जिल्हाधिकारी जळगांव यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान जळगाव विभाग जिल्हा प्रमुख श्री. गजानन माळी, बजरंगदल जिल्हा संयोजक श्री. राजुभाऊ नंन्नवरे, श्री. गोविंदाभाऊ कुंभार, श्री. अशोकभाऊ शिंदे, श्री. सुरेश पाटिल व ईतर युवा सहकारी ऊपस्थीत होते.