युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या श्रीगणेशाची महापौर सौ.महाजन व विरोधी पक्षनेते श्री.सुनिल महाजनांच्या हस्ते प्रतिष्ठापना

54

युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या श्रीगणेशाची महापौर सौ.महाजन व विरोधी पक्षनेते सुनिल महाजनांच्या हस्ते प्रतिष्ठापना

शहर स्वच्छतेसह पाणीबचत, पर्यावरण समतोल, वृक्षलागवडीच्या प्रतिज्ञेद्वारे भक्तांकडून श्रीगणेशाला साकडे

युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या श्रीगणेशाची महापौर सौ.महाजन व विरोधी पक्षनेते श्री.सुनिल महाजनांच्या हस्ते प्रतिष्ठापना
युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या श्रीगणेशाची महापौर सौ.महाजन व विरोधी पक्षनेते श्री.सुनिल महाजनांच्या हस्ते प्रतिष्ठापना

  खंडू महाले✍

जळगांव प्रतिनिधी
📲७७९६२९६४८०📲
जळगाव, ता.10 : सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे व्रत अंगीकारत सदैव विविध उपक्रमांच्या माध्यमातून जळगावकरांना सुपरिचित असलेले युवाशक्ती फाऊंडेशन व करुणा, कल्पना अन् कष्ट हे ब्रीद अंगीकारलेले भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा होणार्‍या गणेशोत्सवांतर्गत शहरातील काव्यरत्नावली चौकात आज शुक्रवार, दि. 10 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन व महापालिकेतील विरोधी पक्षनेते श्री.सुनिल महाजन या दाम्पत्याच्या शुभ हस्ते श्रीगणेशाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. या श्रीगणेश प्रतिष्ठापनेचे यंदाचे 13 वे वर्ष आहे.

याप्रसंगी युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.विराज कावडीया, श्री.अमित जगताप, श्री.प्रितम शिंदे, श्री.भूषण सोनवणे, श्री.पीयूष हसवाल, श्री.प्रवीण बारी, श्री.विशाल तिवारी, श्री.संदीप सूर्यवंशी, श्री.सौरभ कुलकर्णी आदींसह कार्यकर्ते व भक्तगण उपस्थित होते. यावेळी उपस्थित भक्तगणांनी शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचना व नियमांचे तंतोतंत अनुपालन करत महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःच्या घरासह शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सदैव तत्पर राहणे, पाण्याच्या अपव्ययासह होणारी नासाडी थांबविणे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी किमान एक झाड लावून ते दत्तक घेत त्याचे संगोपन करणे यासाठीची प्रतिज्ञा स्वयंस्फूर्तीने घेतली. त्यानंतर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या स्वप्नपूर्तीकरिता सर्वांना शक्ती प्राप्तीसाठी श्रीगणेशाला साकडेही घालण्यात आले.

युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या श्रीगणेशाची महापौर सौ.महाजन व विरोधी पक्षनेते श्री.सुनिल महाजनांच्या हस्ते प्रतिष्ठापना
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी किमान एक झाड लावून ते दत्तक घेत त्याचे संगोपन करणे यासाठीची प्रतिज्ञा घेतांना

भक्तगणांकडून प्रतिज्ञा करवून घेणार : महापौर सौ.महाजन

दरम्यान, महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन म्हणाल्या, की मी आजपासून पुढील दहा दिवस शहरातील ज्या मंडळांच्या ठिकाणी दर्शनास्तव जाईल तेव्हा तेथे उपस्थित गणेशभक्तांकडून स्वतःच्या घरासह शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सदैव तत्पर राहणे, पाण्याच्या अपव्ययासह होणारी नासाडी थांबविणे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी किमान एक झाड लावून ते दत्तक घेत त्याचे संगोपन करणे यासाठीची प्रतिज्ञा करवून घेईल. तसेच शहराच्या सर्वांगीण विकासाच्या स्वप्नपूर्तीकरिता सर्वांना शक्ती प्राप्तीसाठी श्रीगणेशाला साकडे घालेन. यावेळी महापौरांच्या या अभिनव निर्णयाचे उपस्थितांकडून तोंडभरून कौतुक करण्यात आले.