पालघर कॉंग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेला सुरवात, मोखाड्यातुन शुभारंभ,शेवटच्या दिवशी उपस्थित राहणार दिग्गज नेते
सौरभ कामडी
मोखाडा प्रतीनिधी
कॉंग्रेस खासदार ऱाहुल गांधी यांनी देशभरात केलेल्या पदयात्रेचा संदेश महाराष्ट्रातील जिल्हया जिल्ह्यात जावा यासाठी जनसंवाद पदयात्रा सर्व जिल्ह्यातून काढली जाणार असून याची सुरवात मोखाडा येथून करण्यात आली आहे हि यात्रा मोखाडाहुन अनुक्रमे जव्हार,विक्रमगड, वाडा,मनोर होवून पालघर पर्यंत पोहचणार आहे पालघर मध्ये या पदयात्रेची सांगता होणार असून या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,जेष्ठ कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात आदि दिग्गज मंडळी हजेरी लावणार असल्याचे कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष जमशीद(लारा) शेख यांनी सांगितले.कॉंग्रेस कडून राहुल गांधीची जनसंवाद यात्रा अतिशय प्रभावशाली ठरली मात्र हि अगदी सरळ मार्गात कन्याकुमारी ते कश्मीर गेल्याने अनेक राज्यातील अनेक जिल्ह्याना या यात्रेत सामिल होता आले नव्हते यामुळे आता राहुल गांधी महाराष्ट्रभर हि यात्रा काढणार असून त्याची सुरवात झाली आहे.
यावेळी आमदार सुनिल भुसारा यांनी सांगितले कि ज्या प्रमाणे राहुल गांधीनी देशात भारत जोडो यात्रा काढली त्या प्रमाणे तालुका ते जिल्हा हि यात्रा आता सुरुवात झाली असून महागाई,बेरोजगारी याबरोबरच देशात वाढलेले जातीय तेढ यासर्वाना रोखण्यासाठी आपल्याला भाजप विरोधी लढा अधिक तीव्र करावा लागेल त्याच बरोबर या यात्रेत मोठ्यासंख्येने सामिल होण्याचे आवाहनही यावेळी भुसारा यांनी केले यावेळी प्रफुल्ल पाटील,प्रफुल्ल पष्टे यांनी आपली मनोगत व्यक्त केली. या यात्रेचे नियोजन पालघर जिल्हा कॉंग्रेस कडून करण्यात आले असून आठवडाभर हि पदयात्रा सुरुवात राहणार असून ही यात्रा जागोजागी मुक्काम करणार आहे यानंतर जव्हार शहरातील गांधी चौकातही यानंतर सभा होणार आहे याप्रमाणे पवास करीत यात्रा पालघरला धडकणार आहे.मोखाडा तालुकाध्यक्ष जमशीद यांनी या यात्रेच्या शुभारंभाची जबाबदारी अत्यंत नियोजनपूर्वक पार पाडली आहे
या पदयात्रेच्या शुभारंभा प्रसंगी सचिन शिंगडा,आरीफभाई मणियार,आदिवासी आघाडीचे अध्यक्ष अशोक पाटील,तालुकाध्यक्ष जमशीद शेख,राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोठेकर शहराध्यक्ष रफिक मणियार नगरसेवक वामन हमरे आदि बहूसंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.