शिवसेना महाड विधानसभा मतदारसंघ वतीने पोलादपूरमध्ये १७०० इमारत

24

शिवसेना महाड विधानसभा मतदारसंघ वतीने पोलादपूरमध्ये १७०० इमारत

बांधकाम कामगारांची नोंदणी; ५०० कामगारांना गृह उपयोगी वस्तूंचे संच वाटप
*

बांधकाम कामगारांना जेवढ्या योजना आहेत त्याचा लाभ देण्यात येईल

गरिबातल्या गरीब गरजू कामगाराला याचा फायदा होईल नामदार भरत गोगावले*

सिद्धेश पवार,
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
8482851532

पोलादपूर महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार कल्याण योजनेंतर्गत, महाड विधानसभा मतदारसंघातील पोलादपूर तालुक्यातील असंघटित कामगारांना संघटित करण्याचा उपक्रम शिवसेना बांधकाम कामगार संघटनेमार्फत राबविण्यात आला. याअंतर्गत सुमारे १७०० कामगारांची नोंदणी करण्यात आली असून, त्यांना शासनाच्या विविध लाभ योजनांची माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरले, महाराष्ट्र राज्य रोजगार हमी मंत्री नामदार भरत गोगावले यांच्या हस्ते ५०० बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तूंच्या संचांचे वाटप. हा कार्यक्रम आज उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमास शिवसेना सहसंपर्कप्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, नगराध्यक्ष सौ शिल्पा देवेंद्र दरेकर नगरसेविका अश्विनी पवार मृग्या शहा महिला तालुका संघटिका सुवर्णा कदम भाजपा तालुका अध्यक्ष वैभव शेठ चांदे, विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे, बांधकाम कामगार सेना तालुका प्रमुख दत्ताराम मोरे, तसेच युवा सेना उपाधिकारी विक्रांत भिलारे, उपतालुका अधिकारी प्रसाद साने, अनिल भिलारे, सतीश शिंदे, रामदास कळंबे, योजना दूत इंद्रनील पाटील, इंद्रनील पाटील योजना दूत समन्वयक
चंद्रशेखर दवंडे योजना दूत समन्वयक मयूर जाधव किरण मोहिते रुपेश देशमुखव शिवसेना बांधकाम कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नामदार भरत शेठ गोगावले यांनी उपस्थित कामगारांना संबोधित करतानाशासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष कामगारांपर्यंत पोहचवण्याचा हा प्रयत्न भविष्यातही अधिक व्यापक रूपात राबविला जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.