तुमच्यातील एकाला माणगाव मधून निवडून आणू शकतो. काका कदम.

50
तुमच्यातील एकाला माणगाव मधून निवडून आणू शकतो. काका कदम.

तुमच्यातील एकाला माणगाव मधून निवडून आणू शकतो. काका कदम.

तुमच्यातील एकाला माणगाव मधून निवडून आणू शकतो. काका कदम.

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगांव :- कोकाणातील दिलखुलास आणि बिनधास्त व्यक्तिमत्त्व आणि सर्व कोकण करांमध्ये लोकप्रिय झालेले.उगवता व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे लालबाग मधील सामाजिक कार्यकर्ते काका कदम यानी गणेश भक्तांच्या आपत कालिन सेवेसाठी पनवेल ते माणगाव, महाड ते खेड,खेड ते चिपळूण आणि राजापूर पर्यंत उपलब्ध करून दिलेल्या ICU युनिट च्या रुग्ण वाहिकांचा समारोप करण्यासाठी सहकिय विश्रामगृह येथे आले होते. त्यावेळी पनवेल पासून राजापूर पर्यंत चे सर्व कार्यकर्ते यांनी काका ना आग्रह केला की रुग्णवाहिका सेवा ४ ऑक्टोबर पर्यंत सुरू ठेवूया. काका नी ते तत्परतेने मान्य केले. असे जाहीर करताना या रुग्ण वाहिकेत डॉक्टर आहेत, ब्रदर आहेत, त्यांना घेवून गावा गावात आरोग्य तपासणी करून लोकांच्या आरोग्याचे रक्षण करा. जरूर ती औषधे उपलब्ध करून देतो तुम्ही परिपूर्ण सेवा करा. असेच जर काम केलेत आणि लोकाभिमुख झालात तर मी माणगाव मतदार संघातून एकाला निवडून आणीन. आज आपण फार मोठे काम करीत आहोत.जे काम निवडून आणलेल्यानी करायला पाहिजे ते काम आपण करीत आहोत.आज आपण विस्थापित आहोत आणि आपण ज्यांना निवडून दिले ते प्रस्थापित झाले आहेत. त्यांची श्रीमंती प्रत्येक माणगावकर अनुभवतोय. लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. याचा फायदा घ्यायचा असेल तर जसा मी शिवसैनिक आहे तसे आपल्यातील प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या पाक्षात आहेच येथील प्रस्थापित पक्षातील सोडून कारण येथील प्रस्थापितांना आता नक्की कोणता पक्ष त्यांचा उरलाय हेच ते सांगू शकणार नाही. विनाशकाले विपरीत बुद्धी दुसरे काय.. असे ते काहीही असले तरी जर मोठ्या पक्षाने आपल्यापैकी कोणाचा विचार केला तर नाकी निवडणूक लढा. मी नाकी तुम्हाला निवडून आणेन. अगदी अपक्ष लढायचे असेल तर तिरंगी लढतीत येथे अपक्ष नक्की बाजी मारून जाईल. बघा काय ते ठरवा.मी संपूर्ण वेळ तुम्हाला देईन.नक्की निवडून याल. असे उद्गार शासकीय विश्राम गृहात संपन्न झालेल्या समारोप प्रसंगी काढले.नुकताच संपन्न झालेला गणेश उत्सव सण काळात मुंबई गोवा महामार्गावर दुर्दैवाने अपघात घडलाच तर तातडीने वैद्यकीय मदत मिळावी म्हणून ICU UNIT असलेली रुग्णवाहिका ज्यात डॉक्टर्स,पॅरा मेडिकल स्टाफ,कर्मचारी आणि चालक यानी जी अविरत सेवा केली त्यांचे आभार त्यांनी मानले. या वेळी माणगाव व्यापार असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष लक्षमण बाळा दळवी,काका कदम यांच्या नेतत्वाखाली काम करण्यारे जिल्हा समन्वयक तथा अध्यक्ष संतोष रणपिसे सर,चिपळूण,महाड,माणगाव तालुक्यातील तसेच पनवेल मधील डॉक्टर्स,मेडीकल कर्मचारी,चार आयसियु रुग्णवाहिकाचे चालक,माणगाव तालुका समिती सचिव रमेश भाई ढेबे,सक्रीय कार्यकर्ते संजोग मानकर,सुधीर सापळे,संतोष भोरावकर,मुंबई टीम मधुन उपस्थित असलेले महिंद्र बाहुतले, समीर कदम,सोहम कदम,मुरलीधर शिरगावकर आदी उपस्थित होते.

कोकणात गणपती उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. तर अनेक चाकरमानी रोजी रोटी करीता मुंबई सह उपनगर,ठाणे,पालघर, पनवेल,नाशिक,नागपूर तसेच गुजरात राज्यात वास्तव्यास आहेत. ते गणेश उत्सव काळात मुंबई गोवा महामार्गाचा वापरकरीत आपला गावाकडे मोठ्या प्रमाणावर जाण्याकरिता तसेच परतीचा प्रवास करीत असतात. तर या काळात त्यांचा सूरक्षित प्रवास तसेच आरोग्संपन्न राहण्या करीता या वर्षी कोकणाचे सुपुत्र तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री ना. रवींद्र चव्हाण यांचे अमूल्य योगदान लाभले आहे. त्यांनी युद्ध पातळीवर काम केले म्हणूनच हे शक्य झाले आहे. त्यांनी आपण विविध पक्ष्यातील असून सुद्धा आपल्यातील पक्ष कधी मध्ये आणला नाही उलट कोकण विषयीची आपली चळवळ आणि मनापासुंची तळमळ पहिली.आणि आपल्याला कोकणकर म्हणून स्वीकारून आपल्या ओ ला ओ देवून काम केले आहे. त्यांचे आभार मानणे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच आपण यशस्वी झालो आहोत. तसेच आपले वकील ओवेस पेचकर,जयवंत दरेकर यांनीही जी मेहनत घेतली त्या मुळे ही आपण यशस्वी झालो आहोत. पेचकर साहेब यांची कामगिरी बघून एकाध्या राजकीय पक्षांनी पेचकर साहेब याना उमेदवारी दिली तर त्यांनी नकारू नये. आम्ही आहोत तुम्ही फक्त हो म्हणा. तसेच मानगावकर यांनी तयार रहावे. स्थानिक नेतृत्व वगळून जो पक्ष संधी दईल ती स्वीकारावी. बाकी माझ्यावर सोडा असे काका कदम म्हणाले. या संपूर्ण काळाकरीता म्हणजे दिनांक १७ ते सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२३ पर्यंत चार सुसज्ज रुग्णवाहिका,अनेक डॉक्टर्स, स्टाफ तसेच चालक उपलब्ध करून दिले त्या डॉक्टर सुहास देसाई यांचेही आभार मानले.दरम्यान डॉ.हुसैन, डॉ.अहमद,डॉ.इसरार तसेच डॉ.सुफियान यांचे मोलाचे सहकार्य लक्ष्यात घेवून आभार मानले.सर्व डॉक्टर्स मंडळी सह सर्व कर्मचारी यांची राहण्याची सर्व व्यवस्था सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.रवींद्र चव्हाण यांनी आणि त्यांचे स्वीय सहाय्यक श्री.अनिकेत पटवर्धन यांनच्या मार्गदर्शनाने अभियंता अधीक्षक सौ. सुषमा गायकवाड यांनी इतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहकार्याने उत्तम नियोजन केले.
सांगता कार्यक्रमाची सुरूवात भाजपा विस्तारक श्री.रमेश भाई ढेबे यांनी यांनी स्वागत केले तर रणपिसे सर यानी प्रस्तावना तसेच आभर प्रदर्शन केले.तर संजोग मानकर,श्री दळवी अध्यक्ष व्यापारी असोसिएशन यांनी आणि रुग्णवाहिका डॉक्टर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.