यशोधराजी बजाज यांची जयंती साजरी

49
यशोधराजी बजाज यांची जयंती साजरी

यशोधराजी बजाज यांची जयंती साजरी

यशोधराजी बजाज यांची जयंती साजरी

🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351

चंद्रपूर : 11 ऑक्टोंबर
सर्वोदय महिला मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित कमलादेवी शिक्षण महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रांगणात यशोधराजी बजाज जयंती समारोह संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरूवात यशोधराजी बजाज यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण करून झाली. अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या सचिव ममता बजाज यांनी “यशोधराजी बजाज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला व आपले मनोगत व्यक्त केले.” याप्रसंगी प्रमुख उपस्थिती संस्थेच्या सचिव ममता बजाज, प्रमुख पाहूणे म्हणून डॉ. अनुराधा सालफळे, प्राध्यापक विजय कोयाल बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन चंद्रपूर यांनी स्थान भूषविले. तसेच रविंद्र पडवेकर (मुख्याध्यापक) नूतन माध्यमिक विद्यालय चंद्रपूर, अशोक वरभे (मुख्याध्यापक) नूतन प्राथमिक शाळा, चंद्रपूर, तुषार सांबरे (प्राचार्य) यशोधरा बजाज फार्मसी कॉलेज चंद्रपूर, कमलादेवी शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमकांत वाकडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रभाकर मालखेडे यांनी केले. तसेच प्राध्यापिका सूचिता खोब्रागडे, अश्विनी सातपुडके, डॉ. प्रगती बच्चूवार, डॉ. जयमाला घाटे, राजकुमार भगत तसेच ग्रंथपाल चंदन जगताप शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांची उपस्थिती होती.