समाजसेवक (पत्रकार) नितेश पुरारकर यांचे सर्व मतदार बंधू भगिनींना आव्हान.
✍️नंदकुमार चांदोरकर ✍️
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞 89832 48048📞
माणगाव:- सर्वांना माझा सस्नेह नमस्कार
तालुका माणगांव जिल्हा रायगड मधील पुरार ग्रामपंचायत निवडणूक रणसंग्राम सुरू झाला आहे.
ज्यांनी कधी ग्रामसभेला हजेरी लावली नाही .असे पण सरपंच पदासाठी हापापताना दिसतील.
5 वर्षा मध्ये गावाची पडली नाही. गावाचा विकास होतो आहे की नाही याचं काही घेणं देणं नाही .
एकाद्या गोरगरिबांच्या मागे कधी उभे राहिले नाही.
आणि निवडणुकीत उभे राहतील. सर्व मतदान दाता जागा हो . कोणत्याही आमिषाला बळी पडू नको. कोणासमोर लाचार होऊ नको. तुज्या एक मतदानाची किंमत पैशात मोजता येणार नाही एवढी आहे. चिरीमिरी घेऊन 5 वर्ष रडत बसू नको.
ताई माई आक्का आमच्या चिन्हा समोर मारा शिक्का. म्हणणाऱ्यांन पासून सावध रहा.
आपण मत कोणाला विकू नका.असे चमचे खूप येतील ढवळायला.
निवडणुकीत उभा असलेल्या प्रत्येक उमेदवाराचा अभ्यास करा. त्यांनी आपल्या गावासाठी किती योगदान दिले आहे. किती काम आपल्या गावासाठी वाडीवस्त्या मध्ये केले आहे. आणि पुढे आपल्या गावाच्या विकासासाठी शासकिय नीमशासकीय निधी आणू शकतो का?सरपंच पदाचा अभ्यास आहे का. सरपंच म्हणून काय जवाबदारी असते .सरपंचाची कर्तव्य कोणती आहेत. की निवडून येई पर्यंत भूल धापा मारतोय.या सगळ्या गोष्टींची पुष्टी करा.
मगच.सक्षम आणि गावाला आदर्श पातळीवर घेऊन जाणार उमेदवार सरपंच पदासाठी निवडा. धन्यवाद.