यंत्रमाग कामगारांच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने आझाद मैदान येथे लाक्षणिक धरणे आंदोलन

49

यंत्रमाग कामगारांच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने आझाद मैदान येथे लाक्षणिक धरणे आंदोलन 

मीडियावार्ता 

मुंबई : पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री फिरोज मुल्ला सर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा श्री चंद्रकांत जी मुळे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संतोषजी आठवले, कोल्हापूर जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष मा श्री जयसिंगराव कांबळे, मुंबई शहर अध्यक्ष मनोज शिंदे मुंबई प्रदेश संघटक मा सौ मीराताई बावस्कर वहर यांच्या ,मार्गदर्शनाखाली स्वराज्य क्रांती कामगार सेना पॅंथर आर्मी या संघटनेच्या वतीने आज दिनांक १० १० २०२३ रोजी आझाद मैदान मुंबई येथे यंत्रमाग कामगारांच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी एक दिवसाचे लाक्षणिक धरण आंदोलन करण्यात आले

या आंदोलनामध्ये कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष दगडू कांबळे,कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष तानाजी शिंदे कोल्हापूर जिल्हा संघटक सिद्धार्थ गायकवाड कोल्हापूर जिल्हा सचिव दिनकर थोरात इचलकरंजी महानगर जिल्हाध्यक्ष त्रिंबक उर्फ नाना दातार धरणे आंदोलनात बसले आहेत

धरणे आंदोलनात काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

 दिवाळीपूर्वी 8.33% बोनस 21 दिवसाच्या पगारी रजेची रक्कम सहा शासकीय सुट्ट्यांचा पगार, यंत्रमाग कल्याणकारी मंडळाची स्थापना त्वरित करणे, यंत्रमाग कामगारांना साप्ताहिक सुट्टी पगारी, रजेच्या स्वरूपात मिळावी, यासाठी जीआर करणे, मागाचे मागे एक टेक्समार्क हा कायदा अस्तित्वात आणावा, नव्या वस्त्रोद्योग, धोरणाची अंमलबजावणी करावी, या मागण्या घेऊन एक दिवसाचे लाक्षणिक धरण आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनामध्ये या मागण्या मान्य झाल्या नाही तर येत्या काही दिवसात याच आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय स्वराज्य क्रांती कामगार सेना पॅंथर आर्मी या संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे