सरकारला जबाबदार ठरवत, एस.टी कर्मचाऱ्याची आत्महत्या.
आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोटही लिहून ठेवली आहे. यात माझ्या आत्महत्येला एसटी महामंडळातील कार्यपद्धती व ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला
जळगाव:- एस.टी कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. जळगावमधील मनोज अनिल चौधरी या एस.टी कंडक्टरने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चौधरी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोटही लिहून ठेवली आहे. यात माझ्या आत्महत्येला एसटी महामंडळातील कार्यपद्धती व ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
मनोज चौधरी यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. यास जबाबदार एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसाचे ठाकरे सरकार आहे. (शिवसेना) माझ्या घरच्यांचा यात काहीही संबंध नाही. संघटनांनी माझ्या पीएफ आणि एलआयसी वीमा हा माझ्या कुटुंबाला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा असा मजकूर मनोज चौधरी यांनी चिठ्ठीत लिहिला आहे.