नागपूरमध्ये ऑनलाईन फ्रॉड, 8.95 लाख रुपये चोरी

एक फोन आला अन 9 लाखांना मुकला; नागपूरमधील सायबर क्राईमचा धक्कादायक प्रकार

पल्लवी मेश्राम प्रतिनिधी

नागपूर:- देशात ऑनलाईन फ्रॉडच्या प्रकरणात मोठी वाढ होत आहे. ज्या वेगात डिजिटल पेमेंट वाढतंय, त्याच वेगात ऑनलाईन फ्रॉडची प्रकरणंही वाढत आहेत. महाराष्ट्रातील नागपूरमध्ये एक ऑनलाईन फसवणूकीचं हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. नागपुरातील कोराडीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या बँक अकाउंटमधून अज्ञाताने 9 लाख रुपये चोरी केले आहेत. यासाठी वापरण्यात आलेल्या प्रक्रियेने सर्वच जण हैराण आहेत.

नागपूरच्या कोराडीमध्ये राहणाऱ्या अशोक मनवते यांचा 15 वर्षांचा मुलगा, त्यांचा मोबाईल वापरत असताना त्यांच्या फोनवर एक कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने अशोक यांच्या मुलाला वडिलांच्या डिजिटल पेमेंट अकाउंटचं क्रेडिट लिमिट वाढवण्यात आलंय असे सांगत मोबाईलमध्ये एक ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितलं. मुलाने मोबाईलमध्ये ऍप डाउनलोड केलं, त्याचवेळी कॉल करणाऱ्याने त्यांच्या अकाउंटमधून 8.95 लाख रुपये चोरी केले.

अशोक यांचं बँक अकाउंट मोबाईलमध्ये असणाऱ्या ऍपशी जोडलेलं होतं. अशात ज्यावेळी नवं ऍप डाउनलोड केलं, त्यावेळी चोरट्याला त्यांच्या बँक अकाउंटपर्यंतचा संपूर्ण ऍक्सेस मिळाला. त्यानंतर त्याने संपूर्ण पैसे ट्रान्सफर केले.

याबाबत सायबर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून या प्रकरणात आयटी ऍक्टअंतर्गतही रिपोर्ट लिहिण्यात आला आहे. अशाप्रकारचं प्रकरण समोर आल्यानंतर लोकांना ऑनलाईन फसवणूकीबाबत सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here