रत्नागिरी जिल्ह्यात उत्तम दर्जाची आरोग्य सेवा मिळाली पाहिजे, भिम आर्मी कोकण उपाध्यक्ष प्रितेश पवार यांची मागणी.

53

रत्नागिरी जिल्हा प्रतिनिधी✒
रत्नागिरी:- ज्या राज्य घटनेने आम्हाला जगन्याचा अधिकार दिला आहे, तो अधिकार जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा तसेच उत्तम हवा व दर्जेदार आरोग्य सेवा, शिक्षण मिळण्यासाठी आज भिम आर्मी रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने संस्थापक प्रमुख भाई आझाद राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंग, राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे, महाराष्ट्र प्रमुख सीताराम गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली व सचिन जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रितेश पवार यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

आज शासनाची आरोग्य यंत्रणा जिल्हात बिमार अवस्थेत दिसुन येत आहे. रत्नागिरी तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील रुग्णालयात डॉक्टर नाही, दवाई नाही. त्यामूळे अशा वेळी ग्रामीण भागातील लोकांना उपचारा करिता शहरात यावे लागते त्यात मोठ्या प्रमाणात पैसाची बर्बादी होत आहे. अनेक गरीब आज पैसा आणि आरोग्य यंत्रनेच्या अभावा मुळे आपला जीव गमवाला लागला आहे.

दोन दिवसापुर्वी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात आग लागली होती. त्या अग्नी तांडवा मध्ये 11 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी घटना रत्नागिरी जिल्हात हौऊ नये म्हणून जिल्हातील सर्व रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यात यावे असे व्यक्तव्य भिम आर्मी कोकण उपाध्यक्ष प्रितेश पवार यांनी मिडिया वार्ता न्युज जवळ केले.

या प्रसंगी रत्नागिरी तालुका उपाध्यक्ष प्रगती कदम, सदस्य दिनेश पवार, आयुश पवार आणि बहुसंख्य कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.