बोगस डॉक्टर आयॉन रॉय जेरबंद, धारावीत आजून 40% बोगस डॉक्टर आहेत: आकाश शिंदे

56

बोगस डॉक्टर आयॉन रॉय जेरबंद, धारावीत आजून 40% बोगस डॉक्टर आहेत: आकाश शिंदे

बोगस डॉक्टर आयॉन रॉय जेरबंद, धारावीत आजून 40% बोगस डॉक्टर आहेत: आकाश शिंदे
बोगस डॉक्टर आयॉन रॉय जेरबंद, धारावीत आजून 40% बोगस डॉक्टर आहेत

मुंबई महानगर प्रतिनिधी

मुंबई :- धारावी परिसरातील डॉक्टर आयॉन रॉय या इसमास आकाश शिंदे यांचा तक्रारी नुसार धारावी पोलीस ठाणे व मनपा आरोग्य विभाग जी/उत्तर विभाग दादर यांचा संयुक्त कार्यवाही मधे दिनांक 8/11/2021 रोजी त्यांचा मां क्लिनिक मध्ये रेड टाकली असता व सखोल पाहणी केली असता डॉक्टरकीचे व्यवसाय करण्या करिता महाराष्ट्र वैद्यकीय परिषद या शासनाचे प्रमाणपत्र नव्हते व तो डॉक्टरकीचे व्यवसाय करीत होता.

वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 कलम 33(2) नुसार भारतीय दंड संहिता कलम 419/420/336 नुसार जेल बंद करण्यात आले .तपासणी मधे इंजेक्शन/औषध साठा मोठ्या प्रमाणात मिळून आला असून सर्व विना परवाना औषध पोलिस यांनी स्वताच्या ताब्यात घेता बोगस डॉक्टर आयॉन रॉय वर फौजदारी कार्यवाही केली.
कार्यवाही दरम्यान धारावी पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांचा आदेशा नुसार एपीआय विजय कांडागळे  व त्यांची टीम तसेच मनपा वरिष्ठ आरोग्य अधिकारी डॉक्टर विरेंद्र मोहिते व डॉक्टर संदीप पाटील यांचा आदेशा नुसार डॉ. सुनील बुरंगे, डॉ. तनिषा, डॉ. आशीतोष, डॉ. प्रथमेश खाडे , अशोक म्हात्रे, के एच नाईक फौजदारी कारवाई दरम्यान उपस्थित होते.

धारावीत शेकडो बोगस डॉक्टर…

धारावी परिसरात 40 % बोगस डॉक्टर आहेत व बिहार उत्तर प्रदेश शहरातील बनावट प्रमाणपत्र आधारे ते डॉक्टरकीचे दुकान चालवून लोकांचा जीवाशी खेळत आहे. तसेच काही डॉक्टर खोट्या प्रमाणपत्र आधारे महाराष्ट्र वैद्यकीय परिषद येथे ऑनलाइन आर्ज भरून शासनाची फसवणूक ही करीत आहे व पळमार्ग काडित आहे. परंतु पोलीस प्रशासन त्यांना ही समज देत आहे व त्यांचा वर ही काही दिवसात तुरुंग कारवाई होणार अशी माहिती आकाश शिंदे यांनी माहिती दिली. तसेच धारावी मधील 40% बोगस डॉक्टर यांना जेरबंद व कडक कारवाई करण्याकरिता मुंबई मधील प्रतेक स्थानिक पोलिस व मनपा प्रशासनाने एक वेगळी टीम ची नेमणूक करावी अशी मागणी करिता लवकरच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची लवकरच भेट घेणार आहेत.