लोकसत्ताक स्टडी सेंटर सायन मुंबई येथे ७ नोव्हेंबर “विद्यार्थी दिवस” साजरा.

60

लोकसत्ताक स्टडी सेंटर सायन मुंबई येथे ७ नोव्हेंबर “विद्यार्थी दिवस” साजरा.

लोकसत्ताक स्टडी सेंटर सायन मुंबई येथे ७ नोव्हेंबर "विद्यार्थी दिवस" साजरा.
लोकसत्ताक स्टडी सेंटर सायन मुंबई येथे ७ नोव्हेंबर “विद्यार्थी दिवस” साजरा.

गुणवंत कांबळे प्रतिनिधी मुंबई
मो. नं.९८६९८६०५३०

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतापसिंह हायस्कूल सातारा येथे शाळा प्रवेश झाला. म्हणून हा ऐतिहासिक दिवस “विद्यार्थी दिवस” म्हणून साजरा केला जातो.या दिवसाचे औचित्य म्हणून भारतीय लोकसत्ताक संघटना, भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघ, यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसत्ताक स्टडी सेंटर सायन मुंबई येथे साजरा करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण भा.लो.सं.अध्यक्ष मा.अमोलकुमार बोधिराज सर व मा.मनिष जाधव सर याने केले .तसेच दीप प्रज्वलन ऍड रुपाली खळे मॅडम,आणि जान्हवी सावर्डेकर मॅडम यांचा हस्ते करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यासाठी म्हणून मा.अमोलकुमार बोधिराज सर ,मा.प्रेमसागर बागडे सर,मा.मनिष जाधव सर , मा.कमलेश मोहिते सर,ऍड मा.अभिषेक कासे,ऍड मा.रुपाली खळे मॅडम, सर,मा.सुषमा कांबळे मॅडम, मा.जान्हवी सावर्डेकर मॅडम, या सर्व मान्यवरानी मार्गदर्शन उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना “विद्यार्थी दिवस” म्हणजे काय ? तर या दिवसाचे ऐतिहासिक विषयांचे माहिती देऊन मंथन केले.

दिनांक ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतापसिंह हायस्कूल, राजवाडा च़ौक जिल्हा सातारा येथे शाळा प्रवेश झाला या शाळेच्या रजिस्टर मध्ये १९१४ या क्रमांकासमोर बाळ भिवाची स्वाक्षरी असून हा ऐतिहासिक दस्त ऐवज शाळा प्रशासनाने जपून ठेवला आहे “डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन” म्हणजे एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहूल म्हटली पाहिजे.

आजचा प्रत्येक विद्यार्थी हा देशाचे भविष्य आहे.त्यामुळे आदर्श विद्यार्थी निर्माण होणें ही काळाची गरज आहे शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन आहे.आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर परिश्रमांची जाण सर्व विद्यार्थ्यांना होण्यासाठी दि.७ नोव्हेंबर हा दिवस “विद्यार्थी दिवस” म्हणून साजरा करतो.या विषयी माहिती देण्यात आली.प्रत्यकाने आपआपले मनोगत व शैक्षणिक विषयी वेगवेगळी मान्यवरांनी आप-आपले मत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे प्रस्तावना संपूर्ण सूत्रसंचालन मा.सुप्रियाताई मोहिते मॅडम यांनी केले.या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते : पिलाजी माजळकर, मयुरेश जंगम,कमलेश मोहिते,,नरेश कांबळे,अतुल मोहिते,प्रथम कदम,संकेत मोहिते, रितेश मोहिते,मंथन कासारे ,स्वरांगी मर्चंडे,स्मृती कांबळे,सई कांबळे,प्राची शिलकर,गुणवंत कांबळे.तसेच भारतीय लोकसत्ताक संघटना, भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघ, यांचे सदस्य मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.