कळमेश्वर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची तालुका आढावा सभा संपन्न.

59

कळमेश्वर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची तालुका आढावा सभा संपन्न

युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲 95275 26914 📲

कळमेश्वर:- येथील पंकज कुरळकर यांच्या निवासस्थानी कळमेश्वर राष्ट्रवादी काँग्रेसची शहर व ग्रामीणची आढावा सभा नुसतीच संपन्न झाली या सभेत तालुक्यातील आढाव व पक्षसंघटना बळकट करण्यासाठी व नगर परिषद निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच नागपूर व कामठी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार हे लवकरच नागपूर दौऱ्यावर येत असून यावर चर्चा करण्यात आली.

या सभेच्या अध्यक्षस्थानी नागपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबा गुजर महाराष्ट्र ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वरजी बाळबुधे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अविनाश गोतमारे, नागपूर जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष अनिल ठाकरे, सावनेर विधानसभा प्रमुख किशोर चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते. या सभेत पक्षा अंतर्गत अनेक विषयावर चर्चा करण्यात आल्या. आज नागपुर जिल्हात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मोठ्या प्रमाणात प्रभाव वाढत असलेला अनेक कार्यकर्ते पक्षात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी नागपूर जिल्हा सरचिटणीस युवराज मेश्राम, कळमेश्वर तालुका अध्यक्ष भुजंग भोजकर, कळमेश्‍वर शहर अध्यक्ष बबन वानखेडे, मोहपा शहराध्यक्ष रशीद शेख, कळमेश्वर नगरीचे माजी नगराध्यक्ष फत्तेसिंग मरड, पंकज कुरळकर, खुशालजी मंडलिक व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.