“गोर – गरीब मुलांच्या शिक्षणाचे दारे बंद करणाऱ्या नव्या शिक्षण धोरणाचा जाहीर निषेध: सचिन वाघमारे

55

“गोर – गरीब मुलांच्या शिक्षणाचे दारे बंद करणाऱ्या नव्या शिक्षण धोरणाचा जाहीर निषेध: सचिन वाघमारे

"गोर - गरीब मुलांच्या शिक्षणाचे दारे बंद करणाऱ्या नव्या शिक्षण धोरणाचा जाहीर निषेध: सचिन वाघमारे
“गोर – गरीब मुलांच्या शिक्षणाचे दारे बंद करणाऱ्या नव्या शिक्षण धोरणाचा जाहीर निषेध: सचिन वाघमारे

✒️जालना प्रतिनिधी✒️
जालना:- सम्यक विद्यार्थी आंदोलन जालना जिल्हा माजी पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक सचिन वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी केंद्र सरकारने आणलेल्या नवीन शैक्षणिक धोरण मुळे गोर- गरीब विद्यार्थी यांचे शैक्षणिक नुकसान कसे होणार आहे. त्या धोरणाला थांबविण्यासाठी काय करता येईल या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

तसेच विद्यार्थ्यांच्या समस्या व विद्यार्थी शिक्षण हक्क परिषदचे नियोजन करण्यासाठी चर्चा झाली. यावेळी बाळासाहेब रत्नपारखे, राहुल बनसोडे, वैभव वानखेडे, सचिन वाघमारे, गौतम वाघमारे, संतोष आढाव, किशोर उघडे, मुरली बोबडे, देवा वाहूळे, प्रकाश काकडे, भैय्यासाहेब खरात, अक्षय जाधव ,अनिकेत जाधव, शुभम जाधव, रितेश पाईकराव, पटेल आमेर असद आदी पदाधिकारी सह विद्यार्थी उपस्थित होते.