विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024

निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी तहसील कार्यालयात टपाली मतदानाची सुविधा

11 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत करता येणार मतदान

85 वर्षांपेक्षा जास्त वयाचे मतदार व दिव्यांग मतदारांसाठी 14 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत गृहभेटीच्या माध्यमातून मतदानाची सुविधा

आपला अमूल्य मतदानाचा हक्क अवश्य बजवावा : निवडणूक निर्णय अधिकारी दत्तू शेवाळे

मनोज एल खोब्रागडे
✍️सह संपादक✍️
मो 8208166961

परभणी, दि. १० : – निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी / कर्मचारी तसेच पोलीस व होमगार्ड यांना मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येणे शक्य नसल्यामुळे त्यांच्याकरिता टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अशा अधिकारी / कर्मचारी यांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे फॉर्म 12 भरून दिल्यानंतर त्यांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करता येते.

परभणी विधानसभा मतदारसंघात आजपावेतो निवडणूक कर्तव्यावरील 2 हजार 410 अधिकारी, कर्मचारी यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याकरीता फॉर्म नंबर 12 जमा केला आहे. सदर अधिकारी, कर्मचारी यांचे मतदान तहसील कार्यालय, परभणी येथील दुसऱ्या मजल्यावर मतदान सुविधा कक्षात दिनांक 11 नोव्हेंबरपासून ते 18 नोव्हेंबर 2024 पर्यंत घेण्यात येणार आहे.

त्याचबरोबर अनुपस्थित मतदार (ज्यांचे वय 85 वर्षापेक्षा जास्त आहे व दिव्यांग प्रमाण 40 टक्के पेक्षा जास्त आहे) ज्यांना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे शक्य नाही अशा मतदारांचे फॉर्म 12 ‘ड’ भरून घेण्यात आले होते. अशा 85 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 187 मतदार व 67 दिव्यांग मतदार यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाचा मार्ग निवडला आहे. अशा मतदारांची दिनांक 14 नोव्हेंबर ते दिनांक 16 नोव्हेंबर 2024 दरम्यान प्रत्यक्ष गृहभेट घेऊन त्यांचे मतदांन करून घेण्यात येणार आहे. सदर गृहभेटी करीता परभणी विधानसभा मतदारसंघात 6 मतदान पथके नियुक्त करण्यात आले असून सदर मतदान पथके संबंधित मतदारांच्या घरी जाऊन निवडणूक प्रक्रियेचा यथोचित अवलंब करुन त्यांचे मतदान घेणार आहेत.

ज्या कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानाकरीता फॉर्म भरून दिला आहे अशा सर्व अधिकारी- कर्मचारी यांनी तहसील कार्यालय, परभणी येथील मतदान सुविधा कक्षात येऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन परभणी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here