*भिवंडी महानगरपालिकेची प्रभाग आरक्षण सोडत जाहीर होणार*
अभिजीत आर. सकपाळ
ठाणे ब्युरो चीफ
9960096076
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रम हा मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार दिनांक 11/11/2025 रोजी सकाळी 11:00 वाजता मानसी भारत गडा पदवी महाविद्यालय (वाणिज्य व विज्ञान), शांती चंदन सभागृह (हॉल), तळमजला, भिवंडी रोड रेल्वे स्टेशनजवळ, अंजूरफाटा, भिवंडी, जि. ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे.तरी या कार्यक्रमासाठी सर्व लोकप्रतिनिधी, समाजसेवक, नागरीक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भिवंडी महानगरपालिके मार्फत करण्यात आले आहे. तसेच, या आरक्षण सोडतीचे थेट प्रक्षेपण युट्युब या समाजमाध्यमावर देखील करण्यात येणार असून, त्याची लिंक https://youtube.com/@bncmc.bhiwandi.official?si=NgQH5u8jpLEtDSBo अशी आहे. त्यामुळे नागरिकांनी वरील युट्युब लिंकवर देखील सोडत पाहुन शकतील.