Home latest News श्रीवर्धन नगरपरिषद निवडणुकीसाठी मनसेची तयारी — शिलेदार सज्ज!
श्रीवर्धन नगरपरिषद निवडणुकीसाठी मनसेची तयारी — शिलेदार सज्ज!
निलेश भुवड
श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी
मो 8149679123
रविवार, दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी श्रीवर्धन येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नगरपरिषद निवडणुकीसाठी नियोजन बैठक उत्साहात पार पडली. “हेच आमचे शिलेदार… वरिष्ठांचे मार्गदर्शन हिच आमची प्रेरणा!” या घोषवाक्याने सभागृह दणाणून गेले.
या बैठकीत श्रीवर्धन तालुक्यातील मनसेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी एकजुटीचा निर्धार व्यक्त केला. नगरपरिषद निवडणुकीसाठी मनसेचे शिलेदार सज्ज झाले असून, राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास ठेवत, “राजसाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढा देणार” असा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.
ही बैठक विद्यार्थी सेना शहराध्यक्ष हितेश चौले यांच्या निवासस्थानी पार पडली. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वासाचे वातावरण पाहायला मिळाले. बैठकीत नगरपरिषद निवडणुकीसाठीची रणनीती, प्रचार नियोजन, मतदारांशी संवाद, तसेच स्थानिक प्रश्नांवरील मनसेची भूमिका याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
कार्यकर्त्यांनी सर्व महाराष्ट्र सैनिकांना आवाहन केले की,
> “राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून, श्रीवर्धन नगरपरिषदेत मनसेचा झेंडा फडकवूया!”
बैठकीला प्रमुख मान्यवर आणि पदाधिकारीउपस्थित होते:
माजी तालुका अध्यक्ष: राजेश लोहार, माजी शहर अध्यक्ष: संकेत भाटकर, तालुका अध्यक्ष: संदेश कातळकर, शहर अध्यक्ष: रूपेश मयेकर,सचिव: सुमित सावंत, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष: ओमकार चोगले, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष: हितेश चौले, उपतालुका अध्यक्ष: शैलेश कोळथरकर, शाखा प्रमुख (बागमांडला): हेमंत जळगावकर
बैठकीत विविध शाखांतील महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीवर्धन मनसे आता नगरपरिषद निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज झाली असून, “जनतेचा सेवक म्हणून कार्य करण्याचा” ठाम मनोदय व्यक्त करण्यात आला.