*काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांचा वाढदिवस पर्यावरण विभागातर्फे साजरा*
प्रतिनिधी – राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागातर्फे राज्य सचिव कोमल तानाजी घाग यांच्या संकल्पनेतून व पर्यावरण प्रांत अध्यक्ष अशोक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली माहीम दर्ग्याच्या पाठिमागे समुद्र किनाऱ्यावर स्वछता मोहीम आयोजीत करण्यात आली होती.
स्वछता मोहिमेसोबत गेली अनेक वर्ष स्वछतेसाठी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचे एम. पी. सी.सी पर्यावरण विभागातर्फे मानपत्र देवून सन्मान करण्यात आला
या कार्यक्रमाला मुंबईच्या अध्यक्षा श्रीमती साधना महाशब्धे, ए एल एम अनवर खान,इरफान मछिवाला, सिनेअभीनेत्री निना कुलकर्णी तसेच सर्व पर्यावरण पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मान्यवर
अध्यक्ष अशोकराव मोरे यानी पर्यावरणाची ही चळवळ लोकाभिमुख करण्याची ग्वाही दिली आहे.या उपक्रमाची संकल्पना आणि आयोजन कोमल तानाजी घाग यांनी केले होते.यावेळी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सोनिया गांधी यांचा वाढदिवस पर्यावरण पुरक पार पडला.