निवडणूक स्थगितीचा सर्वाधिक फटका काँग्रेस-राष्ट्रवादीला

58

निवडणूक स्थगितीचा सर्वाधिक फटका काँग्रेस-राष्ट्रवादीला

निवडणूक स्थगितीचा सर्वाधिक फटका काँग्रेस-राष्ट्रवादीला
निवडणूक स्थगितीचा सर्वाधिक फटका काँग्रेस-राष्ट्रवादीला

✍मुकेश मेश्राम ✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
7620512045

लाखणी:-भंडारा ओबीसी आरक्षणाच्या मुद्दावरून जिल्हा परिषदेच्या १३ गटांची निवडणूक स्थगित करण्यात आली. याचा सर्वाधिक फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसत आहे. गत निवडणुकीत १३ पैकी सहा गट काँग्रेसकडे तर चार गट राष्ट्रवादीकडे होते. दोन गटावर भाजप आणि एका ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आला होता.
भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ जागांपैकी नामाप्र प्रवर्गातील १३ जागांची निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केली. जिल्हा परिषदेच्या ३९ जागांसाठी आता २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणूक निकालानंतर सत्ता कुणालाही बहुमत मिळाले तरी स्थगित झालेल्या १३ जागांमुळे सत्ता स्थापनेचा पेच निर्माण होणार आहे. ३९ सदस्यांमध्ये सत्ता स्थापन झाली आणि त्यानंतर या १३ जागांसाठी निवडणूक झाली तर पुन्हा सत्तांतर होण्याची भीती आहे. त्यामुळे सर्व निवडणुका एकाचवेळी घ्यावी, अशी भूमिका काही राजकीय तज्ज्ञांनी केली आहे.मात्र उर्वरित गटांमध्ये ही निवडणूक होणार आहे. गतवेळी ४ जुलै २०१५ रोजी निवडणूक झाली होती. त्यावेळी काँग्रेस २०, राष्ट्रवादी १५, भाजप १२ शिवसेना एक आणि अपक्ष चार असे ५२ सदस्य निवडून आले होते. यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली. दरम्यान वर्षभरापूर्वी १५ जुलै २०२० रोजी कोरोना संसर्गामुळे या निवडणुकीवर प्रशासक नियुक्त करण्यात आला होता. दरम्यान डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा झाली.युती-आघाडी झाली नसल्याने सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर लढणारआहे. मात्र अशातच ६ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने नागरिकांचा मागास प्रवर्गातील निवडणुकीला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे या प्रवर्गातून लढणाऱ्या उमेदवारांची निराशा झाली.
गतवेळी काँग्रेसकडे लाखोरी, मुरमाडी, केसलवाडा वाघ, मुरमाडी तुप.. ब्रम्ही आणि भुयार हे गट होते. तर चुल्हाड, सिहोरा, गर्रो आणि सिल्ली हे गट राष्ट्रवादीच्या ताब्यात होते. कांद्री व डोंगरगाव भाजपकडे तर वरठी येथून अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. यात सर्वाधिक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा होत्या. त्यांनाच याचा फटका बसणार आहे.