भारतीय कृषक समाज महाराष्ट्र राज्याचे नारायण गावात अधिवेशन!

भारतीय कृषक समाज महाराष्ट्र राज्याचे नारायण गावात अधिवेशन!

भारतीय कृषक समाज महाराष्ट्र राज्याचे नारायण गावात अधिवेशन!

शेतकऱ्यांना कृषिरत्न, कृषिभूषण, कृषी उद्योग भूषण, जलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार !
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: भारतीय कृषक समाज नवी दिल्ली तत्त्वज्ञानाचे संस्थापक अध्यक्ष भारताचे पहिले कृषी राज्यमंत्री डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या 126 व्या जयंती उत्सव सोहळा शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव च्या परिसरातील हॉलमध्ये होणार असल्याची माहितीभारतीय कृषक समाज महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. सुभाष नलांगे यांनीदिलीआहे.
येथील कृषी विज्ञान केंद्रात झालेल्या बैठकीत उत्सव सोहळ्याच्या नियोजनाबाबत महाराष्ट्र राज्याच्या प्रभारी मार्गदर्शक श्रीमती ज्योती सुरसे यांनी दिलेल्या सूचनेनुसार कृषक समाज संस्थेचे तालुका जिल्हा पदाधिकारी यांच्यासोबत नियोजनाबाबत डॉ. सुभाष नलांगे यांनी सांगितले की या उत्सव सोहळ्याला राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर कृष्णबीर चौधरी यांच्या अध्यक्षते खाली प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्व प्रकारची शेती व शेती व्यवसाय मध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते कृषिरत्न, कृषिभूषण, कृषी उद्योग भूषण, जलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे यासाठी महाराष्ट्रातील सर्व विभाग प्रमुख, तेथील पदाधिकारी, जिल्हा प्रमुख यांना सूचना दिल्या गेल्या आहेत. या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी नियोजनात विविध कमिट्यांचे तयारी सुरू झाली असल्याची माहिती डॉ. सुभाष नलांगे यांनी दिली. कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग शेतकऱ्यांना कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी आपल्या दिवशीच्या निवासाच्या नियोजनासाठी कार्यक्रमाधिकारी डॉ. धोंडो भाऊ दातीर मो.क्र.98224 18914 यांच्यासोबत संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष डॉ. जयपाल पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here