रेल्वेमध्ये 40 वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कार.

50

रेल्वेमध्ये 40 वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कार,.

तमिळनाडू:- मध्ये रेल्वेच्या दोन कंत्राटी कामगारांनी एका 40 वर्षीय महिलेवर रेल्वेमध्येच बलात्कार केला आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार एक 40 वर्षीय महिला भाजी विक्रीचा व्यवसाय करत होती. महिलेने पल्लवरम साठी गाडी पकडली. प्रवासादरम्यान तिला झोप लागली. नंतर गाडी तंबरम यार्डमध्ये पोहोचली. तेव्हा रेल्वे कंत्राटी कामगार सुरेश आणि अब्दुल अझीज तिथे पोहोचले.

अनेकवेळा प्रवासी आपले सामान विसरतात, लाईट्स आणि पंख्याची बटण सुरू राहतात आणि काही लोक दारू पिऊन पडले असतात. हे तपासण्यासाठी सुरेश आणि अब्दुल तिथे पोहोचले आणि त्यांनी या महिलेला पाहिले. तेव्हा दोघांनी या महिलेवर आळीपाळीने बलात्कार केला आणि याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.नंतर पीडित महिलेने रेल्वे पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी काही तासांतच सुरेश आणि अब्दुलला ताब्यात घेतले. पीडित महिलेने आरोपींची ओळख पटवली. पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांची रवानगी कोठडीत केली आहे.