वाराणसीहून आलेल्या अल्पवयीन तरुणीवर औरंगाबादेत सामूहिक बलात्कार.

तरुणीला एकटं पाहून अज्ञातांनी रेल्वे स्थानक परिसरातच एका निर्जन स्थळी नेत तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. औरंगाबादच्या उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

औरंगाबाद:- सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबादेत वाराणसीहून आलेल्या एका अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्काराचा धक्कादायक प्रकार घडला आहे. औरंगाबाद रेल्वे स्थानक परिसरात हा प्रकार घडला आहे. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरुणी वाराणसीवरुन आपल्या नातेवाईकांसोबत औरंगाबादेत आली होती. पण ही तरुणी रस्ता चुकली त्यामुळे तिची आणि नातेवाईकांची भेट होत नव्हती. त्यावेळी तरुणीला एकटं पाहून अज्ञातांनी रेल्वे स्थानक परिसरातच एका निर्जन स्थळी नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणात औरंगाबादच्या उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा घाटी रुग्णालयात पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, परराज्यातून सांस्कृतिक राज्यधानी म्हणवणाऱ्या औरंगाबादेत आलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कारासारखा अत्यंत घृणास्पद प्रकार होणं ही महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. या प्रकरणी पीडित तरुणीला न्याय देण्याचं आव्हान आता औरंगाबाद पोलिसांसमोर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here