अवैध दारू देवळी पोलिसांनी पकडली कारसह 4 लाख 39 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त.
देवळी :- 7 जानेवारी रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून कारसह एकूण 4 लाख 39 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात देवळी पोलिसांना यश आले आहे. सविस्तर माहिती अशी की,दि.7 रोजी कळंब येथून यवतमाळ नागपूर मार्गे देवळी वर्धा येथे अवैधरीत्या दारुची वाहतुक होत असल्याची माहिती मिळराली त्यानुसार देवळी पोलिसांनी नाकाबंदी लावून कार क्रामंक एमएच 02 एन 8831 चा पाठलाग केला.या वाहनाला बस्थ्ळाानकाजवळ अडविण्यात येवून तपासणी केली असता त्यात देशी दारुच्या 29 पेट्या किंमत एक लाख 39 हजार 200 रुपये आढळून आल्या.तसेच कारची किंमत तीन लाख रुपये असा एकूण 4 लाख 39 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी जप्त केला आहे.या कारचा चालक सिध्दार्थ उत्तम जेठीथोर याला अटक करण्यात आली आहे.सदरची कारवाई पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर,उपविभागीय अधिकारी तृप्ती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार नितीन लेव्हरकर यांच्या आदेशाने मडावी, दयाल, सलीम, आकाश, मंगेश आदी पोलिस कर्मचार्यांनी ही कारवाई केली.
Post Views: 82