विहिरगाव बु. येथे धान खरेदी केंद्राचे उद्घाटन
✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱
लाखाणी/साकोली:- तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले विहीरगाव (बु) येथे बोधिसत्व बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था मार्फत विहीरगाव बु. येथे धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन
चुलबंद नदी खोऱ्यात असलेले विहिरगाव बु.येथील बोधिसत्व बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था विहीरगाव बु.मार्फत धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले प्रसंगी माजी सभापती रेखा वासनिक, सामाजिक कार्यकर्ते चुन्नीलाल वासनिक, सरपंच वैशाली कंगाले, बाळू हटनाकर, चतुर्भुज भांडारकर, कृष्णाजी कोयडवार, राकेश लीचडे, विठ्ठल रोकडे, जनार्दन डोंगरवार, नरेश बेलेकर, परलाद इठवले, मनोहर इटवले, अशोक उपरीकर, सदाशिव नेवारे, प्रफुल्ल गोटेफोडे व इतर बहुसंख्य कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
बोधिसत्व बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था मार्फत धान्य खरेदी केंद्राचे केंद्र सुरु झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना धान्य विक्री करिता इतरत्र भटकावे लागणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.