मौजा किन्ही ( गडेगाव ) येथे समता सैनिक दलाची शाखेचे उद्घाटन

49

मौजा किन्ही ( गडेगाव ) येथे समता सैनिक दलाची शाखेचे उद्घाटन

मौजा किन्ही ( गडेगाव ) येथे समता सैनिक दलाची शाखेचे उद्घाटन

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखनी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा जपत त्यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाला अभिवादन करीत लाखनी तालुक्यातील मौजा किन्ही येथे समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डि. एफ कोचे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवीत त्यांच्याद्वारे समता सैनिक दलाच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. युवराज खोब्रागडे ,भंडारा जिल्हा सचिव स.सै.दल प्रा.वासंती सरदार महीला कमांडर स.सै.दल उपस्थित होत्या.

याप्रसंगी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.तत्कालीन समाजातील जातीय भेदभाव व अस्पृश्यता यांमुळे अस्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या समाजाचे संरक्षण व्हावे या उदात्त हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता सैनिक दलाची स्थापना केली होती.

बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करून अनेक तरूण-तरूणींनी मोठया संख्येत समता सैनिक दलात प्रवेश घेतला. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत स्वसंरक्षण व आंबेडकरी जनतेचे संरक्षण करण्याची प्रतिज्ञा याप्रसंगी घेण्यात आली.