धानाचे चुका रे तात्काळ शेतकऱ्यांचे खात्यावर जमा करावे – छ. संभाजी शेतकरी सेवा संघटनेची मागणी.

48

धानाचे चुका रे तात्काळ शेतकऱ्यांचे खात्यावर जमा करावे – छ. संभाजी शेतकरी सेवा संघटनेची मागणी.

धानाचे चुका रे तात्काळ शेतकऱ्यांचे खात्यावर जमा करावे - छ. संभाजी शेतकरी सेवा संघटनेची मागणी.

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी :-देशाचा पोशिंदा आज शेतकरी राजा पूर्णपणे कोलमडला आहे. चार महिन्यापूर्वी धान कापणी,मळणी करून मोजणी साठी तयार आहेत. परंतु ह्या शासनाच्या जाचक अटी,शर्ती,नियम नेहमी अगदी वेळेवर शेतकऱ्यांचा पाठलाग करून,कधी धान मोजणी साठी जागा उपलब्ध नसल्याने साठवून ठेवता येत नाही तर कधी बार दाना तुटवडा,तर कधी वजन काटा,तर कधी हमाली दर. ह्या सर्व होवूनही ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन नुसार धान्य खरेदी केंद्रावर दीड महिना पूर्वी मोजणी केलेली आहे तरी पण आजपर्यंत राष्ट्रीयकृत बँक खाते वगळून ज्या शेतकऱ्याचे सहकारी बँक खाते दिलेले आहेत त्या शेतकऱ्याचे अजूनही धानाचे चुकारे खात्यावर जमा झालेले नाही आहेत. तेव्हा तुम्हीच सांगा माय बाप हो खासदार सुनिल भाऊ मेंढे, आमदार नानाभाऊ पटोले,पालकमंत्री विश्वजित कदम साहेब,जिल्हा पणन अधिकारी साहेब, जिल्हाधिकारी साहेब हे सर्व आमचे लाडके नेते अधिकारी आहेत तेव्हा तुम्हीच सांगा शेतकऱ्याने उन्हाळी धानाचे लागवड सुरू झालेली आहे तरीपण येणारे अडचणी आर्थिक व्यवहार उसने उधार,लग्न समारंभ,आरोग्य,शिक्षण, कृषी कर्ज,बी बियाणे हे सर्व करताना ह्या स्वाभिमानी शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहेत. तरीपण अजूनही उर्वरित शेतकऱ्याचे धान अजूनही मोजणी पासून वंचित आहेत. आणि जे मोजणी झाले त्यांचे रक्कम अजूनही खात्यावर जमा झालेली नाही. तेव्हा ही मोठी गंभीर समस्या वाढत जात आहे. तसेच गोसेधरणाच्या बॅक वॉटर मुळे उभे पीक पाण्याखाली आले आहेत आणि नष्ट झालेले आहेत, काही शेतकऱ्यांचे जाण्याचे मार्ग बंद पडलेले आहेत. तेव्हा काय करावं असा प्रश्न शेतकरी राजा समोर उभा आहे. कोणतेही शासकीय यंत्रणा आणि राजकारणी पुढारी ह्या समस्यांवर उपाय योजना तयार करत नाही. फक्त मतदानासाठी घरोघरी जावून झोळी वाले येतात अानी प्रलोभांना भुरळ पाडतात. तेव्हा मी अशी छ.संभाजी शेतकरी सेवा संघटना व संपूर्ण शेतकरी बंधुच्या वतीनं हात जोडून विनंती करतो की १४ जानेवारी च्या आत धान मोजणी झालेल्या शेतकरी बंधू चे चूकारे तात्काळ बँक खात्यात जमा करून त्यांना सहकार्य करावे. अशी मी आपणास नम्र विनंती छ. संभाजी शेतकरी सेवा संघटनेने केली आहे.