केंद्र नेरी येथे दोन दिवसीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव संपन्न
✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847📞
भंडारा : ( नेरी ) दिनांक १० जानेवारी २०२४ रोजी भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नेरी येथे दोन दिवसीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
दिनांक ८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नेरी येथे शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्व मान्यवरांचे गेटवर आगमन झाले. त्यानंतर लेझीमच्या तालावर नाचत गाजत मान्यवरांना झेंड्याजवळ आणण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले. झेंड्यास सलामी देऊन राष्ट्रगीताने सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सर्व मान्यवर ग्राउंड वर उपस्थित झाले. सर्व मान्यवरांना शाळेच्या अनु क्रमांका नुसार मानवंदना देण्यात आली. सगळ्या मान्यवरांनी छोटे छोटे चिमुकल्याची मानवंदना स्वीकारली , आणि त्यानंतर सर्व मान्यवर स्टेजवर विराजमान झाले.
शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव या कार्यक्रमाचे उद्घाटक मा. श्री.आनंदजी मलेवार जिल्हा परिषद सदस्य भंडारा,कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री.रितेशजी वासनिक सभापती पंचायत समिती मोहाडी, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. श्री.रामरावजी कारेमोरे माजी जिल्हा परिषद सदस्य भंडारा, मा.सौ.मंगलाताई रामरावजी कारेमोरे सरपंच ग्रामपंचायत नेरी, मा.सौ.अनिताताई मेश्राम उपसरपंच ग्रामपंचायत नेरी,
मा. सौ.करुणाताई पडोळे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती नेरी,
मा. पल्लवीताई वाडेकर खंड विकास अधिकारी पंचायत समिती मोहाडी, मा. मनिषाताई गजभिये गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मोहाडी ,मा. श्री.विजयजी आदमने शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती मोहाडी, मा.श्री.किशोरजी डोकरीमारे शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती मोहाडी, मा. श्री.उरकुडे सर केंद्रप्रमुख केंद्र-नेरी, मा.श्री.बिसने सर उच्च श्रेणी मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नेरी, मा. श्री.गुलाबजी सव्वालाखे सरपंच मांडेसर,मा. श्री.देवदासजी माटे सर उच्च श्रेणी मुख्याध्यापक मांडेसर, मा. श्री.भवनजी लिल्हारे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती मांडेसर असे संपूर्ण मान्यवरांच्या हस्ते विद्येची दैवता माँ सरस्वती आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून कार्यक्रमाची विधिवत पुजा अर्चना करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. पुन्हा सर्व मान्यवर स्टेजवर स्थानापन्न झाले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत गीताने स्वागत करण्यात आले. आणि पुष्पगुच्छ देऊन सुद्धा मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर सर्व उपस्थित शिक्षक वृंद पालक वर्ग आणि विद्यार्थ्यांचे तीन टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करण्यात आले. आणि हा स्वागताचा सोहळा इथेच संपविण्यात आले. स्वागताचा सोहळा संपल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र शाळेचे मुख्याध्यापक मा. बिसने सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आणि त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक मा. श्री.रितेशजी वासनिक सभापती पंचायत समिती मोहाडी यांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले.मा. श्री.रामरावजी कारेमोरे माजी जिल्हा परिषद सदस्य भंडारा. यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचा विकास कशाप्रकारे जास्तीत जास्त आपल्याला करता येईल यांच्याकडे शिक्षकांनी लक्ष द्यावे व विद्यार्थ्यांचे विकास करावा अशा प्रकारे खूप छान मार्गदर्शन केले.मा.सौ.मंगलताई कारेमोरे सरपंच ग्राम पंचायत नेरी. यांनी सुद्धा शिक्षकाने शांतपणे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांचे दोन दिवस खेळ घ्यावे आणि सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना नविन वर्षाच्या शुभेच्छा देऊन खूप छान असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री.गुलाबजी सव्वालाखे सरपंच ग्राम पंचायत मांडेसर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचा या खेळामुळे कोणकोणत्या प्रकारे विद्यार्थ्यांचा विकास होतो याविषयी आपल्या भाषणाद्वारे लोकांना समजावून सांगितले. सर्व मान्यवरांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले. आणि त्यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री.आनंदजी मलेवार जिल्हा परिषद सदस्य भंडारा यांनी अध्यक्षिय भाषण सर्व पालकांना शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना शालेय क्रीडा व संस्कृतिक महोत्सव खूप चांगल्या प्रकारे कसे पार पडेल आणि आनंदायी पद्धतीने घेण्यात यावा विद्यार्थ्यांच्या भावनिक बौद्धिक आणि सामाजिक शारीरिक विकास या खेळाद्वारे होत असतो. असे छान मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.श्री.वनवास धनिस्कार सरांनी केले. त्यानंतर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माननीय उरकुडे सर केंद्राचे केंद्रप्रमुख यांनी आभार मानले.
मुलांच्या मैदानी खेळाला सुरुवात झाली आणि मैदानी खेळामध्ये माध्यमिक मुले व मुली कबड्डी, खो-खो प्राथमिक मुले व मुली कबड्डी आणि प्राथमिक मुले व मुली खो-खो हे खेळ घेण्यात आले. त्यानंतर वैयक्तिक स्पर्धा मध्ये १०० मीटर रनिंग, लांब उडी, कुस्ती हे वैयक्तिक खेळ घेण्यात आले. नंतर प्राथमिक विभाग सामूहिक गीत, सामूहिक नृत्य त्यानंतर उच्च प्राथमिक विभाग सामूहिक गीत व सामूहिक नृत्य व नाटिका घेण्यात आले. त्यानंतर प्राथमिक विभाग व माध्यमिक विभाग यांचे लेझीम घेण्यात आले. सर्व कार्यक्रम संपल्यानंतर बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सर्व मान्यवरांनी माँ सरस्वती आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
मा. श्री.अनिलजी गयगये सर अध्यक्ष महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ पंचायत समिती मोहाड यांनी खूप छान मार्गदर्शन केले.
सर्व विजयी चम्मुचे पारितोषिक व गौरवचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले.
सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा .श्री. वनवास धनिस्कार यांनी केले.
बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा.श्री.बिसने उच्च श्रेणी मुख्याध्यापक नेरी यांनी आभार मानले. वंदे मातरम् गीत म्हणून झेंड्यास सलामी देऊन झेंडा उतरविण्यात आले.
अशा प्रकारे आनंदाने खेळीमेळीच्या वातावरणात शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव पार पडले.