परिविक्षाधीन आयएएस तहसीलदाराचा अवधरित्या गौण खनिज उत्खनन करण्यावर कारवाईचा बडगा
तस्करांचे धाबे दणाणले ; अल्प कालावधीत धडाकेबाज कारवाया
✍🏻मनोज आर गोरे✍🏻
चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
मो.9923358970
कोरपना – अवध रित्या गौण खनिजाचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक धडक कारवाई कोरपना चे तहसीलदार रणजित यादव यांनी केली.
यात चार हायवा , पाच ट्रॅक्टर याचा समावेश आहे.चार हायवा कडून एकूण दहा लाख बासस्ट हजार तर पाच ट्रॅक्टर कडून एकूण पाच लाख अठयातर हजार असा सोळा लाख चाळीस हजार रुपयाचा दंड प्रस्तावित करून आकारण्यात आला. यामध्ये
जी आर एन्फ्रा कंपनीचे दोन हायवा हे नियमबाह्यरीत्या रात्री मुरुमाची वाहतूक करताना.तर इतर दोन हायवा व ट्रॅक्टर हे वाहन रेतीची वाहतूक करताना पकडण्यात आले.
सदर कारवाई कोडशी, गडचांदूर येथे करण्यात आली. कोडशी येथे करण्यात आलेली कारवाई ही मोठ्या शिपातीने वेगळीच शक्कल लढवून करण्यात आली.ही कारवाई तहसीलदारांनी तस्करांना चांगलाच गुंगारा देत नियमित मार्ग व वाहन बदलून गनिमी रीतीने पकडुन केली.
या कारवाईमुळे अवध रित्या गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले आहे. परीविशाधिन आय ए एस तहसिलदार रणजित यादव यांनी त्यांच्या नियुक्ती नंतर अवघ्या पंधरा ते वीस दिवसांच्या कालावधीत ही धडक कारवाई करून तस्करीवर चांगलाच आळा बसवला आहे.