भारतीय जनता पार्टीची भूमिका ओबीसी समाजाकरीता अनुकूल – डॉ. अशोक जीवतोडे

60
भारतीय जनता पार्टीची भूमिका ओबीसी समाजाकरीता अनुकूल - डॉ. अशोक जीवतोडे

भारतीय जनता पार्टीची भूमिका ओबीसी समाजाकरीता अनुकूल – डॉ. अशोक जीवतोडे

भारतीय जनता पार्टीची भूमिका ओबीसी समाजाकरीता अनुकूल - डॉ. अशोक जीवतोडे

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर, 11 जानेवारी
भारतीय जनता पार्टीची भूमिका ओबीसी समाजाकरिता अनुकूल आहे. केंद्र व राज्य सरकारने ओबीसी समाजाकरिता अनेक शासन निर्णय काढले आहे. ओबीसींना लाभ मिळावा यासाठी आणखी नाविन्यपूर्ण व विविध योजना राबविण्यात येईल. त्यासाठी केंद्र व राज्य अशा दोन्ही सरकारकडे पाठपुरावा करू, असे मत विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी व्यक्त केले.
ठाणे जिल्ह्यातील भाईंदर (प.) येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये 9 व 10 जानेवारीला भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पदाधिकारी प्रशिक्षण वर्ग पार पडला. या प्रशिक्षण वर्गास अ‍ॅड. माधवी नाईक, संजय गाते, श्रीकांत भारतीय, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, माधवी भंडारी, संगमलाल गुप्ता, अतुल सावे, धनंजय खाडिलकर, संजय केळकर, राम शिंदे, संजय गाते, डॉ. अशोक जीवतोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ओबीसी मोर्चा पदाधिकारी प्रशिक्षण वर्गात ओबीसींच्या प्रश्नांवर सर्वंकष चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. 2024 मध्ये निवडणुकीत ओबीसी मोर्चावर असलेली जबाबदारी, ओबीसी नेतृत्व विकास, केंद्र व राज्य शासनाच्या ओबीसी संदर्भात योजना, ओबीसी पदाधिकारी यांची भूमिका व जबाबदारी, समाज माध्यमांचा वापर, ओबीसीची सद्याची राजकीय परिस्थिती, बूथ सशक्तीकरण आदी विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी ओबीसी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.