नेरळ सेंट्रल रेल्वे मजदूर संघ एन.पी.आय. विरोधात एक दिवसीय साखळी उपोषण

56
नेरळ सेंट्रल रेल्वे मजदूर संघ एन.पी.आय. विरोधात एक दिवसीय साखळी उपोषण

नेरळ सेंट्रल रेल्वे मजदूर संघ एन.पी.आय. विरोधात एक दिवसीय साखळी उपोषण

नेरळ सेंट्रल रेल्वे मजदूर संघ एन.पी.आय. विरोधात एक दिवसीय साखळी उपोषण
✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333📞

नेरळ;सेंट्रल रेल्वे येथील नेरळ रेल्वे फलाट क्रमाक एक वर सेंट्रल रेल्वे मजदूर संघ एन. एफ. आय. आर. यांच्या माध्यमातून न्यू पेन्शन स्कीम रद्द होऊन जुनी पेन्शन योजना चालू करावी याबाबतया बाबत निदर्शने करण्यात आली.

तसेच न्यू पेन्शन स्कीम विरोधात एक दिवसीय उपोषण करण्यात येत आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये रामलीला मैदानामध्ये संपूर्ण भारत देशांमधून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विरोधात न्यू पेन्शन स्कीम रद्द करण्यासाठी आणि जुनी पेन्शन योजना चालू करण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले होते तसेच गेल्या महिन्यांमध्ये बॅलेट पेपर द्वारे लोकांनकडून व कामगारांचा कौल घेतलेला आणि 99% लोकांना न्यू पेन्शन स्कीमला रद्द करून जुनी पेन्शन योजना चालू करा आणि जर ते लागू केले नाही तर आम्ही संपावर जाणार असा इशारा दिला होता.

पेन्शन ही आपल्या म्हातारपणाचा काठी असते आणि जर पेन्शन चालू असेल तर माणूस रिटायरमेंट नंतर स्वाभिमानाने आपले जीवन जगू शकतो.. कोणाचाही आधार न घेता आरामशीर जीवन जगू शकतात त्यासाठी ही एक वेगळी स्कीम आहे ती बंद करू शकत नाही. रेल्वे चालू झाल्यापासून इतकी मोठी योजना पहिल्यांदाच बंद करण्यात आली आहे..

2004 मधील नंतरचे भरती झाले आहेत त्या रेल्वे कामगारांची पेन्शन केंद्र सरकारने रद्द केलेले आहे आणि यासाठी आम्ही विरोध करत आहेत असे सेक्रेटरी गुरनाथ पाटील यांनी सांगितले. केंद्र सरकारला विरोध आहे आणि तीस-पस्तीस वर्षे सर्विस करून जर आम्हाला पेन्शन देत नसेल व जर आमदार खासदार लोक आहेत त्यांनी पाच वर्षाच्या कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांना आयुष्यभर पेन्शन मिळते तर आमदारांना खासदारांना एका टेन्युअर मध्ये एक पेन्शन असेल पाच सहा टेन्युअर पूर्ण केले पाच सहा सात वेळा त्यांना पेन्शन मिळते आणि तीस-पस्तीस वर्षे सर्विस करून आमचा बुढाप्याचा सहारा तुम्ही का हिस्कातून घेत आहात? पेन्शन मिळत नसेल या विरोधात आम्ही संपूर्ण भारत देशामध्ये यांनी नवीन पेन्शन विरोध केला आहे.