चंद्रपूर एसटी बसला ट्रकची जोरदार धडक, प्रवासी बचावले.
चंद्रपूर:- राज्य परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर आगारातील बस गाडीला हायवा ट्रकने मागून जोरदार धडक दिली. पुढे जाण्याच्या नादात ट्रकने दिलेल्या धडकेत बसचा मागील भाग चेंदामेंदा झाला. सुदैवाने, बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. ही घटना बुधवार, 10 फेब्रुवारी रोजी 1 वाजता चंद्रपूर-मूल मार्गावरील लोहारा गावाजवळ घडली. अपघातग्रस्त बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. आगारातून दुसरी बस आणली गेली. त्या बसने त्यांना पुढील प्रवासासाठी मार्गस्थ केले गेले. घटनेची तक्रार रामनगर पोलिसात नोंदवल्या गेली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी चालकास अटक केली. घटनेचा तपास रामनगर पोलिस करीत आहेत.