हिंगणघाटात कोरोना रुग्णांचा विस्फोट; प्रशासनाच्या पायाखालची सरकली जमीन.

प्रशांत जगताप/मुकेश चौधरी
हिंगणघाट :- वर्धा जिल्हातील हिंगणघाट शहरात कोरोना रुग्णांचा ग्राफ अचानक वाढला असल्याने खळबळ उडाली आहे. काल हिंगणघाट शहरांतील संत तुकदोजी वार्ड परीसरातील स्पंदन वसतीगृहातील विध्यार्थी सर्दी, खोकला आणी ताप असल्याने ते सकाळी उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे औषध उपचारासाठी गेले होते, त्यांची कोरोना तपासणी केली असता त्यांची करोना चाचणी पॉजिटिव बाधीत आढळून आली. त्यामुळे स्पंदन वसतीगृहातील इतर विध्यार्थाची तपासणी करण्यात आली. त्यात 39 पैकी 30 विध्यार्थी कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. एका विध्यार्थाला मध्यम स्वरुपाचा आजार (spo2 =94%) असल्याने त्याला सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. 29 विध्यार्थाना स्पंदन वसतीगृहात क्वारेनटाईन करण्यात आले आहे. गुरुवारला स्पंदन वसतीगृह सातेफळ मधिल 250 विध्यर्थी आणी 20 कर्मचा-यांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे.
हिंगणघाट तालूक्यात कोरोना रुग्णवाढीने नवीन विक्रम स्थापित केला. एकाच दिवशी तब्बल 30 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. मागील काही महिन्यांचा आलेख बघता 10 फेब्रुवारी बुधवारी स्पंदन वसतीगृहात 30 विध्यर्थी कोरोना बाधित आढळून आल्याने कोरोना रुग्णांची संख्यात वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
मास्कचा वापर न करणे, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा यासर्व बाबी रुग्णवाढीसाठी कारणीभूत ठरत असून दरदिवशी नवीन रुग्णसंख्या समोर येत आहे. हिंगणघाट शहरात ही रुग्णणवाढ मोठी मानली जात आहे. रुग्णवाढीमुळे आता प्रशासनावर सर्वच स्तरावरून ताशेरे ओढले जात आहेत.
अनेक समाजिक कार्यकर्त्यानी रुग्णवाढीबाबत चिंता व्यक्त केली आहे. वाहनचालक, व्यावसायिक, फेरीवाले, ऑटोरिक्षाचालक, दुकानदार यापैकी अपवाद वगळता कुणीही मास्क घालताना दिसत नाही. प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
कधी होईल अखेर कारवाईला सुरुवात?
मास्कचा वापर न करणा-यांवर अद्याप कुठलीही कारवाई केली जात नसल्याने नागरिक बिनधास्त होते. मात्र रुग्णसंख्या वाढत गेल्यानंतर प्रशासन आता मास्क न वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई सुरू करनार काय?. धोक्याची तसेच चिंतेची बाब म्हणजे वर्धा जिल्हात आणी हिंगणघाट तालूक्यामध्ये पॉझिटिव्ह रुग्णांचा रेट वाढला आहे. मध्यंतरी हीच संख्या कमी झाली होती. मात्र आता कोरोना सुसाट वेगाने वाढत असल्याने सर्वांच्या हृदयाचे ठोके पुन्हा चुकले आहेत.