पुण्यातील चिखली परिसरात गुंगीचे औषध पाजून महिलेवर चुलत दिराने केला बलात्कार.

90

पुण्यातील चिखली परिसरात गुंगीचे औषध पाजून महिलेवर चुलत दिराने केला बलात्कार.

In Pune's Chikhali area, a woman was drugged and raped by her cousin Dira.
In Pune’s Chikhali area, a woman was drugged and raped by her cousin Dira.

पुणे :- पुण्यातील चिखली परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. विवाहितेला ऊसाच्या रसातून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार करून त्याचा व्हिडिओ नातेवाइकांना पाठवण्यात आला. या प्रकरणी पीडितेने आरोपीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या चुलत दिरानेच हे कृत्य केले. चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या चुलत दिराने विवाहितेला ऊसाचा रस प्यायला दिला. आरोपीने त्यात गुंगीचे औषध टाकले होते. त्यामुळे ही महिला बेशुद्ध झाली. आरोपीने बेशुद्धावस्थेत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर व्हिडिओ देखील काढला. हा व्हिडिओ या आरोपीने महिलेच्या नातेवाइकांना पाठवला. याप्रकरणी महिलेने पोलिसांत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

पीडितेच्या तक्रारीनुसार, 8 फेब्रुवारीला ही घटना उघडकीस आली. 28 जानेवारी ते 8 फेब्रुवारीदरम्यान हा प्रकार घडला. आरोपीने व्हिडीओ महिलेचा पती तसेच नातेवाइक आणि मित्रांच्या मोबाइलवर पाठवून व्हायरल केला. त्यानंतर, ही घटना उघडकीस आल्यानंतर महिलेने तात्काळ पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.