फी साठी के.जॉन पब्लिक स्कूल सावनेर ने विद्यार्थ्याना धरले वेठीस.

युवराज मेश्राम प्रतिनिधी
सावनेर:- येथील खापा रोडवरील के.जॉन पब्लिक स्कूल ची विद्यार्थ्यांनी फी न भरल्यामुळे त्यांना प्रवेशद्वारावरच अडविण्यात आले असून त्यांना घरचा रस्ता दाखविला.आणि ताकीद देण्यात आली जोपर्यंत तुम्ही मागील बाकी फी भरणार नाही तोपर्यंत तुम्हाला शाळेत प्रवेश मिळणार नाही.शाळेच्या या वागणुकीमुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हाताला काम नाही, व्यवसाय नाही, जगणे कठीण झाले आहे. त्यातच शाळेची जबरदस्ती फी वसुलीमुळे पालक वर्ग परेशान झालेला आहे.पालक वर्गांनी वारंवार विनंती करून सांगितले की आम्ही मागील थकबाकी फी भरू पण तुम्ही विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश द्या. विनंतीला नकार देत विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारावरच बाहेर उभे ठेवले. पालक प्रमोद ढोले यांनी गट शिक्षण अधिकारी भाकरे साहेब पंचायत समिती सावनेर यांना निवेदन दिले व रीतसर कारवाई करण्याची विनंती केली.