मातोश्री आशाताई कुणावार महाविद्यालयात हिंगणघाट येथे स्व प्रा.अंकिता पिसुद्देला श्रंद्धाजली

55

मातोश्री आशाताई कुणावार महाविद्यालयात हिंगणघाट येथे स्व प्रा.अंकिता पिसुद्देला श्रंद्धाजली

स्व .प्रा अंकिता पिस्सुडे हिला त्वरित न्याय मिळावा- चित्रा वाघ

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी

हिंगणघाट:- स्व प्रा अंकिता पिस्सुडे जळीत हत्याकांडास एक वर्ष पूर्ण होत आहे.,सदर प्रकरण फ़ास्ट ट्रैक कोर्टात सुरु आहे . परंतु अद्यापही प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. फास्ट ट्रैक कोर्टात प्रकरण सुरु असूनही न्याय मिळन्यास दिरंगाई होताना दिसत आहे.तरी प्रा अंकिता हिला त्वरित न्याय मिळावा अशी मागणी भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली. स्व प्रा अंकिता पिस्सुडे हिचे जळीत हत्याकांडास एक वर्ष पूर्ण होत आहे .

त्यानिमित्याने मातोश्री आशाताई कुणावार महाविद्यालयात श्रंद्धाजलिपर कार्यक्रमाचे आयोजन करन्यात आले होते. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख अथिति म्हणून व्यासपीठावर आमदार समीर कुणावार, नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, किशोर दिघे, जिल्हा परिषद सदस्य माधव चंदनखेडे, शिक्षण व आरोग्य सभापती मृणाल माटे, संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग तुळसकर, सचिव , प्राचार्य डॉ उमेश तूळसकर यांची उपस्तीति होती. यावेळी स्व अंकिता पिस्सुडे हिच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन श्रंद्धाजलि अर्पण करन्यात आली. याप्रसंगी आ . कुणावार यांनी अंकिताला लौकरात लौकर न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करुन श्रंद्धाजलि वाहिली. प्रास्ताविक संस्थेचे सचिव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उमेश तुळसकर तर संचालन प्रा अभय दांडेकर यांनी केले. उपस्तितांचे आभार उपप्राचार्य सपना जैस्वाल यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष नितीन मडावी, योगेश फुसे, गजानन राऊत, आशिष पर्वत, आकाश पोहाणे, संजय डेहणे, टिपले, मनीष देवढे, सुनील डोंगरे व हिंगणघाट शहरातील सर्व भाजपा पदाधिकारी, नागरसेवक, नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.