चेक सोमनपल्ली येथे वंचित ची कार्यकारीणी गठित
राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
*गोंडपिपरी :-* तालुक्यात वंचीत बहुजन आघाडी पक्ष बांधणीला वेग आला आहे. गाव तिथे शाखा, निर्माण करणे, आणि शाखा तिथे फलक लावून पक्ष संघटन मजबूत करुण येणाऱ्या जी.प. व पंचायत समिती निवडणुकीत एक हाती सत्ता प्रस्थापित करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वंचीत आघाडीने जोमाने कार्य सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील धाबा पंचायत समिती क्षेत्रात येत असलेल्या चेक सोमनपल्ली इथे दि.१०/०२/२०२२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७=०० वा. कार्यकर्ता बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यात SC, ST, OBC, युवकांनी तसेच वयोवृद्ध लोकांनी चांगला प्रतिसाद देत, पक्षाची ध्येय धोरणे लक्षात घेऊन कमिटीची स्थापना केली. यावेळी तेजराज डोंगरे वंचित आघाडी जिल्हा उपाध्यक्ष,चंद्रपुर यांनी उपस्थित लोकांना पक्षाचे धेय व उदिष्ठे समजावुन सांगीले या प्रसंगी तालुक्यातील पदाधिकारी मा.भारतभाऊ चंद्रागडे तालुका उपाध्यक्ष,मा.लक्ष्मणजी रामटेके तालुका उपाध्यक्ष, मा. पोपटलालजी भसारकर तालुका उपाध्यक्ष, मा.अविनाश राऊत तालुका पदाधिकारी मा. अभिजीत भगत सर्कल अध्यक्ष धाबा मा. सुभाष नेवारे सर्कल पदाधिकारी, चंदन झाडे धाबा सर्कल युवा कार्यकर्ता,आशिष मुंजनकर,इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
सदर बैठकीचे आभारप्रदर्शन युवा सामाजीक कार्यकरता आशीष मुंजनकर यांनी केले,