डागडुजी च्या नावाखाली शाळेचे ऐतिहासिक पुरावे व सौंदर्या नष्ट करण्याचा डाव

61

डागडुजी च्या नावाखाली शाळेचे ऐतिहासिक पुरावे व सौंदर्या नष्ट करण्याचा डाव

डागडुजी च्या नावाखाली शाळेचे ऐतिहासिक पुरावे व सौंदर्या नष्ट करण्याचा डाव

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी:-भंडारा शहरातील सव्वाशे वर्ष जुनी मन्रो शाळेचे कवेलू बदलण्याचे कार्य चालू आहे. डागडुजी करण्यासाठी निघाली होती ही वास्तू पण डागडुजी नावाखाली या शाळेच्या जुन्या बहुमूल्य कवेलू च्या खाली असलेला सांगाडा, इंग्रजांनी विशिष्ट शैलीने तयार केलेल्या हवाकशा, खिडक्या सर्रास तोडण्यात येत आहेत , वास्तविक पाहता या हवाकशा, खिडक्या व कवेलू बसवण्या करिता तयार केलेला लाकडी सांगाडा ज्यामध्ये विशिष्ट पद्धतीने छतावरील पाणी काढण्यासाठी डोंगी ही सुद्धा लाकडापासून तयार केलेली आहे; सव्वाशे वर्षांचा काळ लोटून सुद्धा या सगळ्या वस्तू जशाच्या तशा स्थितीत आहे परंतु या जुन्या कवेलू बदलविण्याचा नावाखाली ऐतिहासिक पुरावे नष्ट करण्याचा डाव तर नाही ना ??? कारण काही कवेलू मध्ये १८६५ सालाची नोंद आहे , सगळीकडे सिमेंटचे जंगल उभे होत असताना शाळेची ही कौलारु ऐतिहासिक वास्तू आपल्या इतिहासाची साक्ष म्हणून उभी आहे . शाळेचे कवेलू, इमारत किंवा तिचा परिसर याची दुरुस्ती व डागडुजी करताना तिचे सौंदर्य अबाधित ठेवणे व मूळ स्थापत्य शैलीला तडा जाणार नाही याचे भान ठेवणे आवश्यक आहे जेणेकरून मन्रो शाळेची ऐतिहासिक वास्तू पुढच्या पिढ्यांन पर्यंत जशीच्या तशी पोहोचवने हे आपले कर्तव्य आहे. भंडारा जिल्ह्याची शान असलेली ही शाळा वाचवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे नाहीतर गांधी शाळेसारखी हे पण शाळा इतिहासात जमा होईल.