प्रेमीकेने घरच्यांशी संगममत करुन प्रेम प्रकरणातुन युवकाला जिवंत पेटवीले. प्रेमीकेसह पाच जण पोलिसांच्या ताब्यात.

57

क्राईम रिपोर्टर मिडिया वार्ता न्युज✒

नाशिक :- नाशिक जिल्हातील देवळा तालुक्यात लोहणेर येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. लोहणेर येथे प्रेम प्रकरणातील वादातून एका प्रेमीकेने आपल्या घरच्या लोकांन बरोबर संगममत करुन एका युवकाला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. त्यामूळे संपुर्ण नाशिक जिल्हा हादळला आहे. याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, संबंधित प्रेमिका बरोबर तिचे पाच नातेवाईक असलेल्या आरोपींना पोलिसांनी बेळया ठोकल्या आहे. यामध्ये पीडित युवक 55 टक्के भाजला असून त्याच्यावर देवळा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गोरख काशीनाथ बच्छाव असे पीडित तरुणाचे नाव आहे.  ताब्यात.

काय आहे प्रकरण??

प्रेमीकेने घरच्यांशी संगममत करुन प्रेम प्रकरणातुन युवकाला जिवंत पेटवीले. प्रेमीकेसह पाच जण पोलिसांच्या ताब्यात.

मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील रहिवासी असलेल्या मुलीचे देवळा तालुक्यात लोहणेर येथील गोरख बच्छाव सोबत सात वर्षापासून प्रेमसंबंध होते. दोघेही नातेसंबंधातील असल्याचे बोलले जाते. मात्र दोन महिन्यांपूर्वीच त्यांचे नाते संबंध तूटले होते. दोघांच्या नाते संबंधात दुरावा आल्यानंतर आरोपी मुलीचे दुसरीकडे लग्न ठरले होते. मात्र काही कारणाने हे लग्न मोडले. त्यामुळे गोरखनेच मुलीच्या सासरच्यांना सांगून लग्न मोडले, असा मुलीला आणि तिच्या घरच्यांना संशय होता. याच संशयातून त्यांनी गोरखला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या आई, वडील व दोन भाऊ यांनी संगनमताने मुलाच्या डोक्यात वार करुन मुलीने अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यात तरुण 55 टक्के भाजल्याची वैद्यकीय सूत्रांकडून माहिती मिळते. देवळा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत युवकाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.

देवळा पोलिसांनी संबंधित मुलगी, तिचे आई वडिल आणि दोन भाऊ यांना ताब्यात घेतले आहे. यापैकी एक आरोपी अल्पवयीन आहे.