मोठी जुई येथील प्राथमिक आदर्श शाळेत " डिजिटल सेफ़्टी व माध्यम साक्षरता " मार्गदर्शन शिबिर संपन्न.

मोठी जुई येथील प्राथमिक आदर्श शाळेत ” डिजिटल सेफ़्टी व माध्यम साक्षरता ” मार्गदर्शन शिबिर संपन्न.

मोठी जुई येथील प्राथमिक आदर्श शाळेत " डिजिटल सेफ़्टी व माध्यम साक्षरता " मार्गदर्शन शिबिर संपन्न.

✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞

पनवेल :-रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील मोठीजुई येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळेत व्यक्तित्व लर्निग लॅब च्या माध्यमातून शाळेतील इयत्ता ५ वी ते ७ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ” डिजिटल सेफ़्टी व माध्यम साक्षरता ” चे मार्गदर्शनपर शिबीर घेण्यात आले.या मार्गदर्शन शिबिरात विद्यार्थ्यांसोबत आजच्या आधुनिक काळात इंटरनेट च्या मीडियाने व्यापलेल्या जगात, डिजिटल संसाधने, इंटरनेट आणि सोशल मीडियाचा अनियंत्रित वापर, चुकीची माहिती व अयोग्य कन्टेंट इत्यादींमुळे विद्यार्थ्यांवर नकारात्मक परिणाम होतात.अभ्यास करण्यासाठी हातात मोबाईल आला असून त्यात असलेल्या इंटरनेट मुळे विद्यार्थी यांना इंटरनेटचे व्यसन लागण्याचे, इंटरनेटचा वाईट प्रभाव, साइबर क्राइम, ऑनलाइन स्कॅम, फिशिंग, अनैसर्गिक व्हिडिओ ईत्यादींना बळी पडण्याचा धोका वाढतो आहे.

यात त्यांचा अभ्यास, डिजिटल सुरक्षितता, मानसिक आरोग्य, वागणूक, इतरांबद्दलचा दृष्टिकोन, कौटुंबिक आणि सामाजिक जीवन यांच्यावर सुद्धा परिणाम होत आहे.तसेच या सर्वांवर उपाय म्हणून लहान वयात व शालेय स्तरापासून ” माध्यम साक्षरता व डिजिटल सेफ़्टी ” चे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.ज्याद्वारे या लहान वयातील मुला मुलींना सर्व प्रकारच्या मीडिया, इंटरनेट आणि इतर डिजिटल तंत्रज्ञान जबाबदारीने आणि सकारात्मक पद्धतीने वापरण्यासाठीचे ज्ञान, क्षमता आणि कौशल्य प्राप्त होईल. या शिबिरामध्ये मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी यांना एक प्रभावी डिजिटल सिटिजन बनण्यासाठी मदत मिळेल.

यावेळी व्यक्तित्व लर्निग लॅबचे निखिल लता गजानन व मयुरा सावी यांनी मार्गदर्शन केले.यावेळी मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत मुख्याध्यापक संजय होळकर सर यांनी करून प्रास्ताविक केले.या कार्यक्रमाला मा. अश्विनी भोईर सरपंच मोठीजुई, तृप्ती बंडा उपाध्यक्ष शालेय व्यवस्थापकीय समिती, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here