विद्यार्थ्यांनी मोबाईल,इंटरनेट व्यसनापेक्षा अभ्यासाचं व्यसन करावं..पोलीस निरीक्षक गणेश कराड तळा हायस्कूल व कॉलेजमध्ये व्यसनाधीनता एक सामाजिक समस्या यावर पोस्टर व निबंध स्पर्धा संपन्न
✍🏻किशोर पितळे ✍🏻
तळा तालुका प्रतिनिधी
मो : 9028558529
तळा :- रायगड पोलीस अधीक्षक कार्यालय अलिबाग यांच्या वतीने तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गो म वेदक विद्यामंदिर तळा येथे पोस्टर स्पर्धा तर कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यसनाधीनता एक सामाजिक समस्या या विषयावर विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कराड म्हणाले कि विद्यार्थ्यांनी मोबाईल,इंटरनेट वापरताना योग्य त्या प्रमाणात वापर करावा त्याचा जास्त वापर करणं टाळावं त्या ऐवजी अभ्यासाचं व्यसन लावा.त्याचानिश्चीतच भावी जीवनात फायदा होईल.असे मौलिक मार्गदर्शन केले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दिलीप ढाकणे, सुहास वावेकर,विनोद कोलवणकर, विनायक महाडकर,गायकवाड मॅडम, पोलीस काॅन्टेबल मनोहर पाटील, पुजा साळुंखे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पोस्टर स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे पोस्टर पाहून ए.पी.आय. गणेश कराड यांनी कौतुक केले. या पोस्टर स्पर्धेत इयत्ता सातवी ते दहावी पर्यंतचे २६ विद्यार्थी सहभागी झाले होते. या पोस्टर स्पर्धेत अंश विनोद कोलवणकर प्रथम, जान्हवी रमेश साळवे द्वितीय तर संस्कृती गणपत कांबळेकर हिने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच ज्युनियरकॉलेजने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत रितेश राजेश नागे प्रथम,जयश्री किशोर काप द्वितीय तर श्रुती महेश ठाकूर हिने तृतीय क्रमांक पटकावला.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तळा पोलीस ठाणे चे सहाय्यकपोलीसनिरीक्षकगणेशकराड,संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत रोडे,उपाध्यक्ष पुरूषोत्तम मुळे, सचिव मंगेशशेठ देशमुख,शाळा समितीचे चेअरमन महेंद्रशेठ कजबजे, प्राथमिक विभागाचे चेअरमन किरणशेठ देशमुख,पन्हेळी हायस्कूलचे चेअरमनश्रीराम कजबजे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक दिलीप ढाकणे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे निवेदन सुहास वावेकर तर आभार मुख्याध्यापक दिलीप ढाकणे यांनी मानले. याप्रसंगी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.