मेडीकल दुकान फोडणा-या दोन चोरांना नेरळ पोलिसांकडून जेरबंद

55
मेडीकल दुकान फोडणा-या दोन चोरांना नेरळ पोलिसांकडून जेरबंद

मेडीकल दुकान फोडणा-या दोन चोरांना नेरळ पोलिसांकडून जेरबंद

मेडीकल दुकान फोडणा-या दोन चोरांना नेरळ पोलिसांकडून जेरबंद

✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333📞

नेरळ : – नेरळ राजेंद्र गुरूनगर आणि गंगानगर भागातील मेडिकल स्टोर मध्ये चोरीची घटना घडली होती. यात सुमारे ८७ हजारांचे सामान चोरीला गेले होते, त्या घटनेनंतर नेरळ पोलिसांनी जोरदार शोध मोहीम हाती घेत दोघांना अवघ्या दोन दिवसात ताब्यात घेवून त्यांना गुन्ह्यात अटक केली आहे.

६ फेब्रुवारी रोजी रात्रौ नेरळ पोलीस ठाणे हददीतील गंगानगर परिसरात असलेले मोडिकल दुकान आणि कर्जत कल्याण हायवे रोडवरील साई तुलसी अपार्टमेंटमधील अर्णव मेडीकल दुकाने कोणी तरी अज्ञात चोरट्याने शटर फोडून चोरी केली होती. मेडीकल गल्ल्यामधील रोख रक्कम घरफोडी चोरी करून चोरून नेली. त्याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे स्वप्नील मधुकर लिंडाईत यांचे तक्रारीवरून नेरळ पोलीस ठाणे गुरनं २६/२०२४ भादवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल होता. तर राजेंद्र गुरूनगर मेडिकल दुकानाचे मालक असावरी गणेश पगारे यांचे तक्रारीवरून नेरळ पोलीस ठाणे गुरनं २७/२०२४ भादवि कलम २७/२०२४ भादवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. सदर मेडीकल दुकाने हे पहाटेचे सुमारास फोडल्याचे प्राप्त सीसीटीव्ही फुटेजच्या अधारे लक्षात आले तसेच मेडीकल दुकाने हे मुख्य रस्त्यावर असल्याने आरोपींनी पोलीसांना खुले आवाहन दिल्यासारखे होते. चोरांचे हे आवाहन नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे त्यांचे मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला.

प्रतिबंधक युनिटचे अंमलदार पोलीस उप निरीक्षक सरगर, सहायक फौजदार किसवे, पोलीस हवालदार म्हात्रे, खंडागळे, दवणे, केकाण, पोलीस शिपाई, वांगणेकर यांनी नेरळ ते बदलापूर हायेवरील सीसीटीव्ही तसेच नेरळ, शेलू, वांगणी, बदलापूर व अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरातील सीटी.व्हीचे प्राप्त फुटेजच्या आधारे, तसेच घटनास्थळा वरील प्राप्त मोबाईल डम डाटाचे तांत्रीक विश्लेषण करून गोपनीय बातमीदारांचे आधारे गुन्हयातील आरोपी निष्पन्न करून त्यांना त्यांचे घरातुन ताब्यात घेतले.सदर गुन्हयामध्ये ताब्यात घेतलेल्या इसम यांच्यात बदलापूर येथील रोहीत शांताराम मालुसरे आणि अंबरनाथ येथील विष्ण्णुसिंग उर्फ अनिलसिंग कपुरसिंग सरदार या दोघांना ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांचेकडून गुन्हयामधील चोरी केलेली रोख रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयातील आरोपी विष्णुसिंग उर्फ अनिलसिंग कपुरसिंग सरदार वय १७ वर्षे ८ महिने हा विधीसंघर्षीत बालक असल्याने बाल सुधारगृहात पाठवण्यात आले.