भद्रावती शहरासह तालुक्यात गारपीट व वादळाचे थैमान, रब्बी पिकांचे नुकसान. पंचनामा करण्याची सभापती भास्कर ताजणे यांची मागणी.

54
भद्रावती शहरासह तालुक्यात गारपीट व वादळाचे थैमान, रब्बी पिकांचे नुकसान. पंचनामा करण्याची सभापती भास्कर ताजणे यांची मागणी.

भद्रावती शहरासह तालुक्यात गारपीट व वादळाचे थैमान, रब्बी पिकांचे नुकसान.
पंचनामा करण्याची सभापती भास्कर ताजणे यांची मागणी

भद्रावती शहरासह तालुक्यात गारपीट व वादळाचे थैमान, रब्बी पिकांचे नुकसान. पंचनामा करण्याची सभापती भास्कर ताजणे यांची मागणी.

मनोज गोरे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो.9923358970

भद्रावती :- भद्रावती तालुका तालुक्यातील गावांना दिनांक दहा रोज शनिवारला रात्रोच्या दरम्यान गारपिटासह भयंकर वादळाने झोडपले. या गारपीट तथा वादळामुळे तालुक्यातील 90% गावातील रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तहसीलदारांनी तलाठ्यांना शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश द्यावे व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भास्कर ताजने यांनी केली आहे.शनिवारला रात्र अचानक गारपीट तथा प्रचंड वादळाला सुरुवात झाली. या घटनेत तालुक्यातील मांगली, तिरवंजा, चंदनखेडा मांगली , पिरली, सागरा, तथा तालुक्यातील 90% गावातील हरभरा, तूर, गहू व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. या वादळात रब्बी पीक जवळपास पूर्णपणे उध्वस्त झाले, तर या वादळामुळे अनेक झाडांच्या फांद्या व झाडे कोसळली. सदर घटना रात्रीच्या वेळेस घडल्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. वादळामुळे शहरातील तथा तालुक्यातील अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. या घटनेची गंभीरतेने दखल घेऊन तहसीलदारांनी तलाठ्यांना शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी शेतकरी वर्ग यांनी केली आहे.