अपर जिल्हाधिकारी यांचेकडील न्यायालयीन पेशी 1 एप्रिल पासून दर मंगळवार,बुधवार व गुरुवारला.
✒️मनोज खोब्रागडे✒️
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. 11 मार्च :- अपर जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे न्यायालयात दाखल केलेल्या किंवा दाखल करण्यात येत असलेल्या अर्ध न्यायिक अपिल प्रकरणात होणा-या पेशी व तारीख आता 1 एप्रिल 2021 पासून प्रत्येक आठवड्यातील मंगळवार,बुधवार व गुरुवार रोजी सकाळी 10.30 वाजता घेण्यात येणार आहेत.
तरी संबंधित वादी, प्रतिवादी व त्यांचे अधीवक्ता यांनी या बाबीची नोंद घ्यावी, असे अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी कळविले आहे.