महिला दक्षता समीती सदस्यापदी रंजना सोळंकी व उज्वला साठोणे यांची निवड.
✒युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
मोवाड, दि, 11 मार्च:- येथील नगरपरीषदेच्या माजी नगराध्यक्षा रंजना संजय सोळंकी आणि भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस कमेटीचे सक्रीय नेते सामाजिक कार्यकर्ते वसंतराव साठोणे यांची धाकटी सुन ऊज्वला साठोणे यांची मोवाड शहर महीला दक्षता समीती सदस्यपदी नुकतीच निवड करण्यात आली. ही निवड मोवाड चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश बोथले यांनी केली.
पोलीस स्टेशन नरखेड येथे निवड प्रक्रीयेदरम्यान प्रमुख ऊपस्थीती म्हणुन रखेड ठाण्याचे पोलीस निरिक्षक जयपालसिंग गीरासे, नरखेड प. स. उपसभापती वैभव दळवी, पि. एस. आय. मनिषा सावरकर, ज्योती काळबांडे, लक्ष्मी उईके, तसेच उज्वला वैद्य यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थीती होती.
महिला अत्याचाराचे प्रमाण दिवसेंनदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महिला असुरक्षित असल्याचे दिसत आहे. त्यांना न्याय व हक्क मिळवुन देण्यासाठी तालुका स्तर तसेच ग्रामीण पातळीवरील सुशिक्षित, होतकरू व धडाडीच्या सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या महिलांची दक्षता समीती म्हणुन काम करण्याची ही सुवर्णसंधीच असल्याचे या सदस्यांनी सांगीतले. मोवाड शहर महीला दक्षता समीती सदस्यपदी रंजना सोळंकी व उज्वला साठोणे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल स्थानीक जगदंबा माध्यमिक शाळेचे कार्याध्यक्ष वसंतराव साठोणे, मोवाड न.प. चे माजी नगराध्यक्ष अनिल साठोणे, प्राचार्य ईंगळे सर, मधुकरजी गायधने, डाॅ. सुधीर साठोणे, पुष्पाताई गायधने, डाॅ. सोनाली साठोणे, गीता अंतुरकर तसेच हेमलता महतपुरेसह मोवाड व नरखेड येथील बहुतांश महीला व नागरीकांनी नवनियुक्त सदस्यांचे अभीनंदन केले.